‘जिओ’च्या यशानंतर रिलायन्स बाजारामध्ये ‘जिओ फायबर’ ही ऑप्टिकल फायबर केबल आधारित ब्रॉडबँड सेवा घेऊन आली आहे. पाच सप्टेंबर या जिओच्या तिसऱ्या वाढदिवशी जिओ फायबर सेवेचं कमर्शिअल लाँचिंग करण्यात येणार आहे. यामध्ये ग्राहकांना १०० एमबीपीएस ते एक जीबीपीएस इतका अफाट इंटरनेट स्पीड मिळणार आहे. फक्त ७०० रुपयांपासून ते १० हजार रुपयांपर्यंतच्या दरात विविध योजना देण्यात येणार आहेत. जिओ फायबरद्वारे व्यक्तिगत पातळीपासून ते कार्यालये, लहान मोठे उद्योजक तसेच कंपन्यांना हायस्पीड इंटरनेट कनेक्शन मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. जिओ फायबर जोडणीसाठी ऑनलाइन नोंदणी करण्यात येत आहे.

अशी करा नोंदणी-

– जिओ फायबरच्या नोंदणीसाठी https://gigafiber.jio.com/registration

– तुमच्या ठिकाणाचे नाव लिहा

ज्याठिकाणी जिओ फायबरची जोडणी हवी, तेथील संपूर्ण पत्ता टाका

– त्यानंतर आपले संपूर्ण नाव, फोन नंबर आणि ई-मेल आदी माहिती द्या.

– तुमच्या फोन नंबरवर एक ओटीपी येईल, तो टाका आणि सबमिटचे बटन दाबा

महत्वाचे-
– नोंदणीसाठी कोणतीही किंमत आकारली जाणार नाही.
– तुम्ही ज्या भागात राहता त्या भागात जिओ फायबरचं जाळं पोचलेलं असेल तर जोडणी मिळणं शक्य होणार आहे.
– जिओच्या वेबसाईटवर तुमच्या भागात जोडणी मिळणे शक्य आहे की नाही हे समजण्याची सोय आहे.
– जिओ गिगा फायबरची किंमत जागतिक पातळीचा विचार करता स्पर्धकांच्या तुलनेत एक दशांश असल्याचा दावा मुकेश अंबानी यांनी केला आहे.
– वर्षभराचा प्लॅन घेतल्यास टिव्ही आणि सेट टॉप बॉक्स मोफत मिळणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे.

जिओ फायबरची वैशिष्ट्ये?

– ७०० रुपयांपासून ते १० हजार रुपयांपर्यंतच्या दरात
– यामध्ये केबल टीव्ही, व्हॉइस कॉलिंग आणि नवे सिनेमे
– ज्या दिवशी सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार त्याच दिवशी पाहता येणार. जून २०२० नंतर ही सेवा सुरूवात होणार.
– एक अब्ज घरांमध्ये इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) ने कनेक्ट करण्याचं रिलायन्सचं लक्ष्य
– जिओ भारतातील पहिली तर जगातली दुसरी मोठी टेलिकॉम ऑपरेटर सेवा
– अनेक स्मार्ट होम सुविधा

Story img Loader