दिवस असो वा रात्र एखाद्याने ‘थोडा चहा घेणार का’, असा प्रश्न विचारल्यानंतर त्याला ‘हो’ असे उत्तर देण्याचा मोह सहसा कुणाला आवरत नाही. त्यामुळे दिवसभरातून थोडा थोडा म्हणत भरपूर चहा प्यायला जातो. मस्त आले, वेलची घातलेला कडक चहा पिऊन मन अतिशय शांत होते. अंगातील सर्व शिणवटा दूर होऊन तरतरी येते. पण, नेमका चहाचा कप हातात घेताना किंवा चहा पिताना तो अंग, जमीन किंवा एखाद्या कपड्यावर सांडला तर? अरेरे… विचार करूनच आपण अस्वस्थ होतो नाही का?

पण, हा किस्सा प्रत्येक व्यक्तीसोबत कधीतरी होतच असतो. अशा वेळेस हे डाग घालवण्यासाठी काय बरे करावे? यासाठी धावपळ सुरू होते. काही जण आपल्या खिशातील रुमालाने कपड्यावर सांडलेला चहा टिपून घेऊ लागतात; तर काही जण टिश्यू पेपरसाठी शोधाशोध करतात. तात्पुरत्या केलेल्या उपायांनी चहाचे डाग कमी होतात; पण निघून जात नाहीत. अशा वेळेस जर शर्ट किंवा ड्रेस फिकट, पांढऱ्या रंगाचा असेल, तर मग ते कपडे न वापरण्यालायक होतात.

varun dhwan baby john trailer launch
वरुण धवनचा रावडी अंदाज आणि जबरदस्त अ‍ॅक्शन असलेल्या ‘बेबी जॉन’चा ट्रेलर प्रदर्शित; अभिनेता म्हणाला, “हा सिनेमा खूपच…”
14 December Rashi bhavishya In Marathi
१४ डिसेंबर पंचांग: आज १२ पैकी ‘या’ राशींवर…
court sentences man to 20 year imprisonment for sexually assaulting girl by making false marriage promise
पुणे: लग्नाचं आमिष दाखवणं पडलं महागात; लैंगिक अत्याचारा प्रकरणी ‘या’ न्यायालयाने सुनावली वीस वर्षाची शिक्षा
benefits of eating saunf before bed
रात्रभर झोप लागत नाही? झोपण्यापूर्वी ‘हे’ खा; शांत झोप लागेल अन् तणावही होईल दूर
shukra guru make navpancham yog
नवपंचम राजयोग देणार पैसाच पैसा; ‘या’ तीन राशींवर शुक्र-गुरूची होणार कृपा
Salman Khan
‘दबंग’ रिलोडेड लाइव्ह कॉन्सर्टसाठी सलमान खान सज्ज; म्हणाला, “स्टेजवर जाण्याआधी कपडे…”
Madhukar Pichad
Madhukar Pichad : भाजपाचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं निधन; ८४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Ageing affects your stomach
वय वाढल्यामुळे वारंवार पोटाचे आजार होतायत? वृद्धत्वामुळे तुमच्या पोटावर आणि त्याच्या कार्यांवर होतो ‘असा’ परिणाम; वाचा, तज्ज्ञांचा सल्ला…

हेही वाचा : हिवाळ्यात बद्धकोष्ठतेचा त्रास होतोय? ‘या’ पाच सवयी असू शकतात यामागचे कारण….

चहाचे चिवट डाग काढणे हे काम जरी अवघड आणि अशक्य वाटत असेल तरीही ते तितके कठीण नाही. घरी जर हे पाच सोपे उपाय केले, तर कपड्यांवरून तुम्हाला अगदी सहज चहाचे डाग काढता येऊ शकतात. त्यासाठी काय करायला ते लक्षात घ्या.

कपड्यांवरील चहाचे चिवट डाग कसे काढावेत?

१. थंड पाण्याचा वापर

चहाचे थेंब तुमच्या कपड्यांवर पडले असतील, तर ताबडतोब ते डाग गार पाण्याखाली धुऊन घ्यावेत. पाण्यामध्ये चहाचे हे डाग सहज निघून जातात. त्यामुळे तुम्ही कपड्याची आतील बाजू वर करून (कपडा उलट करून) चहाच्या डागावर गार पाणी सोडावे. त्यानंतर डाग हलक्या हाताने चोळून धुऊन टाकावेत.

२. लिक्विड साबण

केवळ पाण्याने जर चहाचे डाग गेले नाहीत, तर घरी कपडे धुण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या लिक्विड साबणाचा वापर करू शकता. एका बादलीत गार पाण्यात डाग असणारा कपडा भिजवून ठेवा. १०-१५ मिनिटांनंतर डाग असलेला भाग लिक्विड साबण लावून घासून घ्यावा. त्यानंतर पुन्हा गार पाण्यात कपडा धुऊन घ्यावा.

हेही वाचा : किलोभर कांदे-बटाटे एकाच टोपलीत? ही चूक तुम्ही करू नका; लक्षात घ्या कारण….

३. बेकिंग सोडा

बेकिंग सोडा स्वयंपाकघरातील चिवट, घट्ट डाग काढण्यासाठी वापरला जातो हे सगळ्यांनाच माहीत आहे. पण, याचा वापर करून तुम्ही कपड्यांवर असलेले चहाचे डागदेखील काढता येऊ शकतात. त्यासाठी सगळ्यात पहिला डाग असलेला कपडा व्यवस्थित ओला करून घ्यावा. नंतर त्यावर बेकिंग सोडा घालून, तो रात्रभर तसाच ठेवून द्या. दुसऱ्या दिवशी कपडे घासून गार पाण्याने धुऊन घ्यावेत.
परंतु, तुम्हाला इतका वेळ घालवायचा नसेल, तर ही दुसरी पद्धत वापरून पाहा.
त्यासाठी बेकिंग सोडा आणि पाणी एकत्र करून, त्याची पेस्ट करून घ्या आणि कपडा ओला करून, त्यावर ती पेस्ट लावून डाग असणाऱ्या भागावर घासून घ्या.

४. व्हिनेगर

कपड्यावरील डाग घालवण्यासाठी तुम्ही व्हिनेगरचाही उपयोग करू शकता. त्यासाठी डाग पडलेला कपडा गार पाण्याच्या बादलीत घालून, त्यामध्ये १ २ चमचे व्हिनेगर घालून काही मिनिटांसाठी भिजवून ठेवा. त्यानंतर बादलीतील कपडा पिळून पुन्हा नळाखाली धुऊन घ्या. त्यामुळे कपडा खराब होऊ न देता, चिवट डाग निघून जाण्यास मदत होईल.

५. लिंबाचा रस

लिंबाच्या रसाचा उपयोग करूनसुद्धा तुम्ही चहाचे डाग कपड्यावरून सहज काढू शकता. लिंबामध्ये असलेल्या सायट्रिक अॅसिड आणि जंतुनाशक घटकांमुळे हे चिवट डाग काढणे सोपे होते. एका बादलीत गार पाणी घेऊन, त्यामध्ये लिंबाचा रस घालून घेऊन, चहाचा डाग असणारा कपडा या पाण्यात भिजवून ठेवा. काही मिनिटांनंतर भिजवलेला कपडा बाहेर काढून गार पाण्याखाली धुऊन घ्या.

Story img Loader