‘तुमच्यासाठी काय पण’ असे म्हणणारे अनेक प्रेमवीर आपण आजपर्यंत पाहिले असतील. सध्या इंटरनेटवर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओतील विदेशी तरूणाचा अंदाज याच वाक्याची आठवण करून देणारा आहे. फ्रँक आणि सिमरन यांच्या विवाहसोहळ्याचा हा व्हिडिओ आहे. यामधील फ्रँक हा विदेशी तरूण असून सिमरन ही भारतीय तरूणी आहे. यावेळी आपल्या भारतीय पत्नीसाठी फ्रँकने चक्क हिंदी गाणे गायले. बॉलीवूडच्या ‘आशिकी-२’ चित्रपटातील ‘तुम ही हो’ गाणे फ्रँकने ज्या भावुकतेने गायले आहे, ते पाहून अनेकजणांनी या व्हिडिओला पसंती दर्शविली आहे. ज्या पध्दतीने फ्रँकने हे गाणे सादर केले आहे, ते पाहाता त्याला यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागली असणार हे जाणवते. या गाण्यातील काही शब्द फ्रँकच्या आंग्लाळलेल्या स्वरात ऐकताना खरचं मजा येते. फ्रँकने गाण्यातून अशी भावनिक साद घातल्यानंतर सिमरनला तिच्या डोळ्यांतील आनंदाअश्रू आवरणे कठीण जात होते. या सगळ्यामुळे लग्नाच्या ठिकाणी यामुळे एकप्रकारचे भावनिक वातावरण तयार झाले होते.
संग्रहित लेख, दिनांक 15th Jul 2015 रोजी प्रकाशित
पाहा: फ्रँकच्या ‘आशिकी’ अंदाजाने सिमरनसह सर्व व-हाडी थक्क!
'तुमच्यासाठी काय पण' असे म्हणणारे अनेक प्रेमवीर आपण आजपर्यंत पाहिले असतील.

First published on: 15-07-2015 at 03:44 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Romantic video get viral on internet