Fitkari For Flower Plants, Marathi Gardening Tips: आपली बाल्कनी फुलांनी बहरून जावी यासाठी कित्येक जण प्रत्येक वीकएंडला मेहनत घेत असतात. पण तुमचे कष्ट जर योग्य पद्धतीने केलेले नसतील तर राबूनही फार उपयोग होतोच असं नाही. विशेषतः फुलझाडांच्या बाबत महागड्या खतांची गरज नसते तर तुम्ही अगदी घरगुती पद्धतीने सुद्धा खत तयार करून रोपांना बहर आणू शकता. अनेकदा आपण फक्त रोपांना उन्हात ठेवलं, दिवसात दोन वेळा पाणी दिलं की रोपं वाढतात असे समजतो पण आपल्याला रोपाच्या वाढीसाठी तीन गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. एक म्हणजे तुम्ही रोपांसाठी वापरत असलेल्या मातीचा PH स्तर, पाणी व खताच्या वापराची वारंवारता तसेच बुरशी न लागण्यासाठी करायचे उपाय. आज आपण कुंडीत लावता येणाऱ्या फुलझाडांना भरपूर कळ्या आणण्यासाठी घरगुती उपाय पाहणार आहोत.

SP मराठी गार्डनिंग या युट्युब अकाउंटवर फुलझाडांना कळ्या येण्यासाठी करायचा तुरटीचा उपाय आज आपण पाहूया. यामध्ये दिलेल्या माहितीनुसार मातीचे सुद्धा दोन प्रकार असतात, क्षार युक्त माती व आम्ल युक्त माती. जेव्हा यातील कोणताही गुणधर्म कमी जास्त होतो तेव्हा त्याचा प्रभाव रोपाच्या वाढीवर दिसून येऊ लागतो. हेच टाळण्यासाठी मातीची ph पातळी योग्य असणे आवश्यक आहे. यासाठी आपल्याला तुरटीची मदत होऊ शकते. मात्र किती प्रमाणात तुरटी वापरावी हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे अन्यथा फायद्याच्या ऐवजी नुकसानच होऊ शकते.

how to make kaju curry at home
Recipe : घरच्याघरी बनवा ढाबा स्टाईल ‘काजू करी’! जाणून घ्या अचूक प्रमाण अन् कृती….
How Sugar Effects On body can digestive cookie make you fat
बिस्किटाच्या पुड्यात किती साखर असते? क्रीम, गोडाची व चटपटीत बिस्किटांची निवड करताना काय बघावं?
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
How To Make Amchur At Home kairichi Amboshi Pickle recipe
आजीच्या पद्धतीनं घरच्या घरी “आंबोशी” या पद्धतीने बनवा; वर्षभर टिकणारी चटकदार रेसिपी एकदा पाहाच

तुरटीचा वापर कसा करावा?

आपण महिन्यातून किमान एकदा हा तुरटीचा उपाय करू शकता. आपल्याला एक चमचाभर तुरटीची पावडर वापरायची आहे. पाच लिटर पाण्यात तुरटीची पावडर मिसळून तुम्हाला हे पाणी सर्व रोपांना द्यायचे आहे. यामुळे पीएच पातळी स्थिर होण्यास मदत होईल. याशिवाय तुरटीच्या उग्र गंधामुळे रोपांना बुरशी लागणे किंवा किड्यांनी रोप पोखरले जाणे असेही त्रास कमी होऊ शकतील.

हे ही वाचा<< सकाळच्या चहानंतर दोन मिनिटात पावडरचा हा जुगाड करून ठेवाच! घरात असा वापर केल्यास वाचतील पैसे

तुरटीच्या पाण्याचा वापर आपण फुलझाडांवर करून पाहू शकता यामुळे. तुम्हाला ही आयडिया कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा.