करोना विषाणूच्या संक्रमणामुळे आपल्या आयुष्यावर कमालीचा परिणाम झाला आहे. लॉकडाउनमुळे ज्या ग्राहकांचा रोख रकमेचा ओघ आटला आहे, त्या ग्राहकांना मदत करण्यासाठी अनेक बँका मॉरेटोरिअम (ईएमआय स्थगित करून पुढे ढकलणे) ही सुविधा देत आहेत. परंतु, हप्ता पुढे ढकलल्यास त्यावर व्याज भरावे लागणार असल्याने, ज्या ग्राहकांना कोविड १९ साथीमुळे आर्थिक फटका बसलेला नाही त्या ग्राहकांनी ईएमआय नियमितपणे भरावा. असंख्य संख्येने ग्राहक आपापल्या बँकेच्या इंटरनेट बँकिंग साइटचा वापर करून ईएमआय स्थगित करण्याचा पर्याय स्वीकारत असल्याने, या ग्राहकांना लुटण्यासाठी नव्या प्रकारचे घोटाळे करण्याची संधी शोधणारे घोटाळेखोर सातत्याने प्रयत्न करत आहेत. काही केसेसमध्ये, घोटाळेखोर ग्राहकांना कॉल करत आहेत, त्यांचे ईएमआय पुढे ढकलण्यासाठी बँकांनी जाहीर केलेल्या मॉरेटोरिअमचा फायदा घेणयासाठी त्यांना ओटीपी विचारत आहेत. एकदा ग्राहकाने ओटीपी दिला की घोटाळेखोर ग्राहकांच्या खात्यातून तातडीने पैसे काढून घेतात. अशा घोटाळेखोरांबद्दल जागृती करण्यासाठी आणि ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी, आयसीआयसीआय बँकेने सुरक्षितपणे बँकिंग कसे करावे, याचे मार्गदर्शन केले आहे. त्यामध्ये, मोबाइल बँकिंग करत असताना, ग्राहकांनी कोणत्या सुरक्षेच्या टिप्स विचारात घ्याव्यात, याचा समावेश करण्यात आला आहे.

१) ईएमआय मॉरेटोरिअमचा लाभ घेण्यासाठी ओटीपी शेअर करू नका: ईएमआय किंवा व्याजदर भरणे पुढे ढकलण्यासाठी (मॉरेटोरिअम) तुमचा ओटीपी किंवा पासवर्ड मागण्यासाठी तुमची बँक कधीही तुम्हाला कॉल करणार नाही किंवा ईमेल पाठवणार नाही. ओटीपी, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड नंबर, सीव्हीव्ही नंबर, नेटबँकिंग किंवा मोबाइल बँकिंग पासवर्ड, कस्टमर आयडी, यूपीआय पिन असा कोणताही गोपनीय किंवा खासगी तपशील बँक कर्मचाऱ्यासह कोणालाही देऊ नका.

न्यायालयीन प्रक्रियेच्या दुरुपयोगासाठी जनहित याचिका नको; याचिकाकर्त्यांना ५० हजार रुपयांचा दंड
Lok Sabha Election, Lok Sabha Election 2024,
डोके ठिकाणावर ठेवून मतदान कराल ना?
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
Sales of e-vehicles pune
गडकरींनी वारंवार सांगूनही लोकांनी फिरवली पाठ! ई-वाहनांच्या विक्रीला गती मिळेना

२) मोबाइल बँकिंग अॅपवरील ‘ऑटो सेव्ह’ किंवा ‘ऑटो कम्प्लिट’ ही वैशिष्ट्ये बंद करून ठेवा: मोबाइल बँकिंग व इंटरनेट बँकिंग व्यवहार करत असताना, ऑटो फिल किंवा सेव्ह युजर आयडी किंवा पासवर्ड सुरू करू नका. हे वैशिष्ट्य वापरण्यासाठी सोयीचे असले तरी ते धोकादायक ठरू शकते.

३) फिशिंग टेक्स्टला प्रतिसाद देऊ नका : अनभिज्ञ ठिकाणाहून आलेल्या URL चा वापर करू नका किंवा वैयक्तिक माहिती किंवा ऑनलाइन बँकिंग तपशील ईमेलद्वारे किंवा टेकस्ट मेसेजद्वारे कोणालाही देऊ नका. हा तुमची ओळख चोरणाऱ्या प्रयत्न असू शकतो.

४) व्हेरिफिकेशन कॉलपासून सावध राहा : कॉलर सहसा बँकेचा प्रतिनिधी किंवा बँकेच्या तांत्रिक टीममधील असल्याचे भासवतो. सुरक्षेची खोटी खात्री दिल्यानंतर, कॉलर ग्राहकांना त्यांचा वैयक्तिक तपशील व गोपनीय माहिती देण्यासाठी भाग पाडतात. याबद्दल जेव्हा संशय येईल तेव्हा बँकेला किंवा तुमच्या बँकेशी संबंधित वित्तीय सेवा संस्थेला कॉल किंवा ईमेल करा आणि या कॉलविषयी सांगा.

५) खाते वेळोवेळी तपासा : तुमच्या आर्थिक आरोग्याविषयी जाणून घेणेही महत्त्वाचे आहे. तुमच्या आर्थिक बाबींचा मागोवा घेण्यासाठी तुमची बँक खाती नियमित तपासा. प्रत्येक वेळी व्यवहार करत असताना, खात्यातील बॅलन्स पुन्हा तपासा आणि योग्य रक्कम भरल्याची किंवा स्वीकारल्याची खात्री करा. कोणतीही विसंगती आढळली तर तातडीने तुमच्या बँकेशी संपर्क साधा.

६) नोटिफिकेशन देणारा पर्याय सुरू ठेवा : तुमच्या बँकेकडून मिळणारे ईमेल व एसएमएस नोटिफिकेशन सुरू ठेवावे. यामुळे, तुमच्या खात्यातून होणाऱ्या व्यवहारांविषयी तुम्हाला माहिती मिळेल. संशयास्पद व्यवहार होत असल्याचे ओळखण्यास मदत होईल व तसे बँकेला वेळेत कळवता येईल.

७) यूपीआय व्यवहार करत असताना सुरक्षेचे उपाय : सुरक्षित व सुलभ पद्धतीने बँकिंग करणे शक्य होण्यासाठी एनपीसीआयने यूपीआय पेमेंट व्यवस्था दाखल केली आहे. बँकिंगची अनेक वैशिष्ट्ये, फंड रुटिंग, कलेक्शन रिक्वेस्ट व पेमेंट रिक्वेस्ट सुरळितपणे करता येऊ शकते. व्यवहार करत असताना, केवळ पेमेंट करत असताना पिनची गरज लागते, पेमेंट स्वीकारत असताना लागत नाही, हे ग्राहकांनी लक्षात ठेवावे. ग्राहकांनी स्क्रीन-शेअरिंग अॅपवर मर्यादा घालाव्यात आणि पिन, कार्ड व ओटीपी यांचा तपशील कधीही कोणालाही देऊ नये. ग्राहकांनी केवळ विश्वासार्ह अॅप डाउनलोड करावेत आणि एटीएम पिनप्रमाणे एम-पिन सांभाळावा व कोणालाही सांगू नये.

अधिक खबरदारी घेण्यासाठी, पेमेंट अॅपवर लॉकची सोय करावी. स्क्रीनवरील टेक्स्ट काळजीपूर्वक वाचा आण एखाद्याने यूपीआय अॅपवर अनावश्यक मनी रिक्वेस्ट पाठवली आहे का हे तपासा. घोटाळ्याचा कोणताही संशय आल्यास व्यवहार नाकारा. अखेरीस, तुमच्या स्मार्टफोनवर परिणामकारक मोबाइल अँटि-मालवेअर किंवा अँटि-व्हायरस सॉफ्टवेअर इन्स्टॉल करा आणि ते सतत अपडेट करा. सुरक्षित राहा! सुरक्षित बँकिंग करा!