How To Remove Permanent Tattoo: तरूणाईमध्ये नेहमीच नवनवीन ट्रेन्ड वायरल होत असतात. परदेशातून सुरू झालेला ट्रेंड आता भारतातही खूप लोकप्रिय झाला आहे, मग ते फॅशनसंदर्भात असो किंवा ब्युटीसंदर्भात. नेहमीच नवीन गोष्टी आत्मसात करण्यासाठी ही तरूण मंडळी उत्साही असतात. सध्या तरूणांमध्ये टॅटू काढण्याचा ट्रेन्ड आहे. पण अनेकदा हा टॅटू काढताना काहीशा चुका होतात किंवा मग तो आपल्याला पाहिजे तसा दिसत नाही. अशावेळी तो टॅटू नकोसा वाटतो. किंवा सुरुवातीला टॅटू चांगला वाटतो मात्र काही दिवसांनंतर मात्र तोच टॅटू आवडत नाही. मग तो घालवायचा विचार येतो. अनेक वेळा लोक प्रेमात पडतात आणि आपल्या प्रियकर आणि प्रेयसीचे नाव टॅटूने लिहितात, परंतु दुर्दैवाने ब्रेकअप झाले तर लोकांना तो टॅटू काढून टाकावासा वाटतो. पण आजकाल तंत्रज्ञानाने इतकी प्रगती केली आहे की आपण कायमस्वरूपी टॅटू सुरक्षितपणे आणि प्रभावीपणे काढू शकता. ते कसे हे जाणून घेऊया.

पण खरचं असं शक्य आहे का?, खरं तर पूर्णपणे नाहीसा करणं अवघड आहे. डॉ. सोनिया टेकचंदानी यांच्या मते, पर्मनंट टॅटूपासून सुटका करणं एवढंही सोपं नसतं. यामुळे त्वचेवर डाग राहण्याचा धोकाही असतो. याचबरोबर इन्फेक्शन आणि पिगमेंटेशनच्या समस्याही होऊ शकतात.

Upcoming WhatsApp feature to tell you when someone was recently online will also show you a list of people
लास्ट सीन सोडा, आता व्हॉट्सॲप दाखवणार यादी; कोण, कधी ऑनलाइन आहे मिनिटांत कळणार
lancet study on breast cancer how early diagnosis and understanding relapse can help women
भारतात दर चार मिनिटांनी एका महिलेला स्तनाच्या कर्करोगाचे निदान; महिलांकडे दुर्लक्ष होतंय का? वाचा तज्ज्ञांचं निरीक्षण
forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
Loksatta explained Is Apple ReALM better than ChatGPT
ॲपलचे ReALM चॅटजीपीटीपेक्षा सरस? येत्या जूनपासून ‘एआय’ क्षेत्रात धुमाकूळ?

लेझर ट्रिटमेंट –

टॅटू रिमूव्ह करण्यासाठी लेजर ट्रीटमेंटचा सहारा घेतला जाऊ शकतो, कारण यामध्ये लेढर बीमद्वारे पिगमेंट किंवा डायला तोडून टॅटू फेज करण्यात येतो. यामुळे प्रभावित भागांतील स्किन ट्रिटमेंटनंतर पाढऱ्या रंगाची होते. टॅटू काढून टाकण्यासाठी अनेक सेटिंग्ज करण्यात येतात. ही ट्रिटमेंट फार खर्चिक असते. अनेकदा टॅटू पूर्णपणे नाहीसा होण्याऐवजी लाइट होतो. तसेच यामुळे अ‍ॅलर्जीक रिअ‍ॅक्शन होण्याचाही धोका असतो.

सर्जिकल मेथड –

शस्त्रक्रियेद्वारे कायमस्वरूपी टॅटू काढले जाऊ शकतात. यासाठी भूल देऊन त्वचा सुन्न केली जाते. यानंतर सर्जिकल ब्लेडच्या मदतीने टॅटू काढला जातो. सर्जिकल टॅटू काढणे प्रभावी आहे. पण कधी कधी डाग पडतात. ही पद्धत सहसा लहान टॅटूसाठी राखीव असते आणि ती खूप प्रभावी असू शकते, परंतु ती सर्वात धोकादायक पद्धत देखील आहे. डाग पडण्याचा आणि संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो आणि जखम बरी होण्याचा वेळ जास्त असू शकतो.

हेही वाचा – Skin care tips: उन्हाळ्यात मान काळी झालीये? ‘हे’ घरगुती उपाय फॉलो करा

डर्माब्रेसन –

डर्माब्रेसन एक मेडीकल प्रक्रीया आहे, ज्यामध्ये त्वचेची एपिडर्मिसला एब्रेसन किंवा सँडिग हटवलं जातं. यानंतर नवीन स्किन लेयर तयार होते. परंतु यामध्ये त्वचेवर डाग राहू शकतो. बॅलून्सचा प्रयोग करताना टॅटूचा सर्जिकल रिम्ह्यूवल जे स्किनमध्ये इन्सर्ट करण्यात येतं आणि त्यामुळे टिश्यू एक्सपॅन्शन होतं. टॅटू असणारी स्किन निघून जाते आणि टिश्यू पसरल्यामुळे डाग राहण्याची शक्यता कमी असते.

मिठाचं पाणी –

लेझर ट्रिटमेंट किंवा इतर टॅटू रिमूव्ह करणयासाठी वापरण्यात येणाऱ्या ट्रिटमेंटपैकी सर्वात सोपा आणि घरच्या घरी करण्यात येणारा उपाय म्हणजे, मीठाचं पाणी. पाण्यामध्ये मीठ एकत्र करून कॉटनच्या सहाय्याने टॅटूवर रब करा. असं दररोज करा पण अर्ध्या तासापेक्षा जास्त असं करू नका.