सॅमसंगने आपला नवीन बजेट स्मार्टफोन Samsung Galaxy M21 भारतात लाँच केला आहे. ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप असलेला हा फोन आउट ऑफ बॉक्स अँड्रॉइड 10 वर कार्यरत असेल. यात प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सलचा आहे. तर, 123 डिग्री अल्ट्रा वाइड अँगल लेन्ससोबत 5 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. सेल्फीसाठी पुढील बाजूला 20 मेगापिक्सलचा सेंसर आहे. सेल्फी कॅमऱ्यात AIबेस्ड फीचर्स असून फेस अनलॉक पर्यायही उपलब्ध आहे. या फोनमध्ये 6 जीबी रॅमचा पर्याय असून यात कंपनीने इन्फिनिटी यू डिस्प्ले दिलाय. भारतीय बाजारात सॅमसंग गॅलेक्सी एम21 हँडसेटची Realme 6 आणि Redmi Note 9 Pro या स्मार्टफोनसोबत स्पर्धा असेल.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स  Samsung Galaxy M21 specifications, features :-
फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6,000 एमएएच क्षमतेची दमदार बॅटरी असलेला हा फोन अँड्रॉइड 10 वर आधारित One UI 2.0 वर कार्यरत असून यामध्ये 6.4 इंच का फुल-एचडी+ (1080×2340 पिक्सल) इन्फिनिटी यू सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले आहे. कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शन असलेल्या या फोनमध्ये Mali-G72 MP3 GPU सोबत ऑक्टा-कोर अ‍ॅक्सीनॉस 9611 प्रोसेसर देण्यात आले आहे. सॅमसंग गॅलेक्सी एम21 चे इनबिल्ट स्टोरेज 128 जीबीपर्यंत असून कनेक्टिव्हिटी फीचर्समध्ये 4जी व्हीओएलटीई, वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस/ ए-जीपीएस, युएसबी टाइप-सी आणि 3.5 एमएम हेडफोन जॅकचा समावेश आहे. फोनमध्ये मागील बाजूला फिंगरप्रिंट सेंसरही देण्यात आले आहे.

Amazon Great Summer Sale Start On May Second hundreds of deals across various product categories
अर्ध्या किंमतीत स्मार्टफोन, स्मार्टवॉच, आयपॅड, खरेदी करण्याची संधी; कधी सुरु होणार सेल ? जाणून घ्या
Mumbai, stolen mobile phones,
मुंबई : चोरीचे मोबाइल विकणाऱ्याला अटक
Motorola launches Edge 50
बाकी कंपन्यांची उडाली झोप, मोटोरोलाचा जबरदस्त डिस्प्लेसह स्मार्टफोन देशात दाखल, मिळताहेत भरमसाठ ऑफर्स
pune, young engineer girl , overcomes a rare disorder, Treatment of Gartner, Duct Cyst, Marsupialization Procedure, rare disease to girl, rare disease pune, doctor, pune news, marathi news,
अभियंता तरूणीची दुर्मीळ विकारावर मात! मार्सपियलायझेशन प्रक्रियेद्वारे गार्टनर्स डक्ट सिस्टवर उपचार

आणखी वाचा- सहा कॅमेऱ्यांच्या शानदार स्मार्टफोनसाठी ‘खास सेल’, मिळेल भरघोस डिस्काउंटही

किंमत Samsung Galaxy M21 price in India :-
सॅमसंग गॅलेक्सी एम21ची किंमत 12 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे. ही किंमत 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज मॉडेलची आहे. तर, 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मॉडेलच्या किंमतीबाबत अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही. हा फोन मिडनाइट ब्लू आणि रेवन ब्लॅक रंगात उपलब्ध असेल. फोनच्या विक्रीसाठी अ‍ॅमेझॉनवर 23 मार्च रोजी दुपारी 12 वाजता सेलचं आयोजन करणायात आलं आहे. हा फोन म्हणजे सॅमसंग गॅलेक्सी एम20 ची अपग्रेडेड आवृत्ती असल्याचे सांगितले जात आहे.