तब्बल 6,000 एमएएच क्षमतेची दमदार बॅटरी असलेला सॅमसंग गॅलेक्सी ‘एम-30 एस’ हा एम मालिकेतील बजेट स्मार्टफोन स्वस्त झाला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या पाय या आवृत्तीवर कार्यरत असून यावर कंपनीचा वनयुआय हा युजर इंटरफेस दिलेला आहे. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये वॉटरड्रॉप नॉचसोबत सुपर अ‍ॅमॉल्ड डिस्प्ले आणि एक्सनॉस 9611 एसओसी प्रोसेसर दिला आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार या फोनच्या किंमतीत एक हजार रुपयांची कपात झाली आहे.

एक हजार रुपयांच्या कपातीनंतर सॅमसंग गॅलेक्सी ‘एम-30 एस’ हा स्मार्टफोन नव्या किंमतीसह सर्व ऑनलाइन आणि ऑफलाइन रिटेल स्टोअर्समध्ये उपलब्ध असेल. यातील 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत आता 12 हजार 999 रुपये आणि 6GB रॅम व 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 14 हजार 999 रुपये झाली आहे. फोटोग्राफीसाठी याच्या मागील बाजूला ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. यातील मुख्य कॅमेरा 48 मेगापिक्सल क्षमतेचा आहे, तर 5 मेगापिक्सल आणि 8 मेगापिक्सलचे इतर दोन कॅमेरे आहेत. तर, सेल्फीसाठी यामध्ये 16 मेगापिक्सल क्षमतेचा कॅमेरा आहे. ओपल ब्लॅक, सफायर ब्ल्यू आणि पर्ल व्हाइट अशा तीन रंगांमध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध आहे.

फीचर्स :-
– 6.4 इंच आकारमानाचा, फुल एचडी प्लस ( 2340 बाय 1080 पिक्सल्स)
– सुपर अॅमोलेड आणि इन्फीनिटी-यू या प्रकारातील डिस्प्ले
– सॅमसंगचाच ऑक्टो-कोअर एक्झीनॉस 9611 हा प्रोसेसर
– 4 जीबी रॅम+64 जीबी स्टोअरेज आणि 6 जीबी रॅम+128 जीबी स्टोअरेज असे दोन व्हेरिअंटचे पर्याय