scorecardresearch

पोस्टात दररोज भरा ५५ रूपये अन् मिळवा १० लाख रुपयांचा विमा

या महिन्यात पोस्ट ऑफिसची बँक सुरु होणार आहे. पण, तुम्हाला हे माहित आहे का की पोस्ट ऑफिसमधून तुम्हाला विमाही मिळतो. भारतात ब्रिटीश शासन असताना १ फेब्रुवारी १८८४ मध्ये पोस्टल लाइफ इनश्युरन्स म्हणजे पीएलआय सुरू झालं होतं. ही भारतातील सर्वात जुनी विमा योजना आहे. आज पीएलआय योजने अंतर्गत ४३ लाखांहून अधिक पॉलिसी होल्डर आहेत. या योजने […]

पोस्टात दररोज भरा ५५ रूपये अन् मिळवा १० लाख रुपयांचा विमा

या महिन्यात पोस्ट ऑफिसची बँक सुरु होणार आहे. पण, तुम्हाला हे माहित आहे का की पोस्ट ऑफिसमधून तुम्हाला विमाही मिळतो. भारतात ब्रिटीश शासन असताना १ फेब्रुवारी १८८४ मध्ये पोस्टल लाइफ इनश्युरन्स म्हणजे पीएलआय सुरू झालं होतं. ही भारतातील सर्वात जुनी विमा योजना आहे. आज पीएलआय योजने अंतर्गत ४३ लाखांहून अधिक पॉलिसी होल्डर आहेत. या योजने अंतर्गत तुम्ही १० लाखापर्यंतची विमा पॉलिसी घेऊ शकता. दररोज ५५ रूपये भरून १० लाख रुपयांचा विमा घेऊ शकता.

पोस्ट ऑफिस PLI अंतर्गत ३ प्रकारचे योजना उपलब्ध आहेत. Whole Life Assurance (Surksha): PLI च्या या योजनेला सुरक्षा या नावानेही ओळखले जाते. ही एक अशी योजना आहे ज्यात विमा ग्राहकाच्या मृत्यूनंतर मिळणारा बोनस आणि निश्चित रक्कम नॉमिनीला दिली जाते.

ही पॉलिसी घेण्यासाठी कमीत कमी वय १९ वर्ष आहे आणि जास्तीत जास्त वय ५५ वर्ष आहे.PLI च्या या योजनेअंतर्गत कमीत कमी निश्चीत रक्कम २० हजार रुपये आणि जास्तीत जास्त १० लाख रुपये आहे.

Endowment Assurance (Santosh): Postal Life Insurance च्या या योजनेला संतोष नावानेही ओळखले जाते. या योजनेअंतर्गत विमादात्याला ठरावीक रक्कम देण्याचे आश्वासन देण्यात येते. या दरम्यान विमादात्याचा अचानक मृत्यू झाला तर नॉमिनीला ती रक्कम आणि बोनस देण्यात येतो.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-11-2018 at 10:57 IST

संबंधित बातम्या