Metabolic Reset Drink : आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीत चुकीचे आहार आणि चुकीची जीवनशैली आपल्या आरोग्यावर खोल परिणाम करत आहे. आहारात समाविष्ट प्रक्रिया केलेल खाद्यपदार्थ, आरोग्यास हानिकारक पदार्थ आणि मसालेदार-तेलकट पदार्थ केवळ शरीरातील विषारी घटक जमा करत नाहीत, तर यकृत, मूत्रपिंड आणि पचनक्रियेवरही मोठा परिणाम करतात. या विषारी घटकांमुळे थकवा,पुरळ, पोटफुगी, पोटदुखी, केस गळणे आणि रोगप्रतिकारशक्ती कमी होणे यांसारख्या समस्या खूपच सामान्य झाल्या आहेत.
अशा वेळी शरीर निरोगी ठेवण्यासाठी नैसर्गिक डिटॉक्स ड्रिंक्सचे सेवन खूप फायद्याचे ठरते. आजकाल सोशल मीडियावर जिरे पाणी, मेथीदाणे पाणी, बडीशेपचे पाणी, तुळस आणि लिंबू पाणी असे हर्बल ड्रिंक्स प्रचंड लोकप्रिय झाले आहेत, जे शरीरातून विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करतात. हर्बल ड्रिंक चयापचय वाढवतात, पचन सुधारतात. हे पेय गॅस आणि सारख्या त्रासांवर नैसर्गिक उपाय मानले जातात.
एम्सचे माजी कन्सल्टंट आणि साओल हार्ट सेंटरचे फाउंडर व डायरेक्टर तसेच प्रसिद्ध कार्डियॉलॉजिस्ट डॉ. बिमल झांझर यांनी अशाच एका खास ड्रिंकबद्दल माहिती दिली आहे, ज्यामुळे ‘मेटाबॉलिक रीसेट’ होते. हा रीसेट पेय धने, मेथी, बडीशेप, दालचिनी आणि आलं एकत्र करून तयार केले जाते. हा पेय शरीराचा चयापचय प्रणाली संतुलित करते आणि वजन कमी करण्यास मदत करते. याच्या सेवनाने मुत्रपिंड आणि यकृतची अवस्था सुधारते.
चयापचय प्रणाली रिसेट ड्रिंकचे फायदे
या पेयामध्ये असलेले हर्बल घटक शरीराच्या जवळपास प्रत्येक भागाला फायदा देतात.
- धणे: पोटदुखी कमी करते आणि पचन सुधारते.
- सौंफ: यामधील नेचरल ऑइल्स गॅस्ट्रोइंटेस्टाइनल स्नायूंना विश्रांती देतात आणि गॅस- पोटफुगीचा त्रास कमी करतात.
- आलं: अपचन दूर करते आणि पोटात गेलेलं अन्न हळूहळू पोटातून बाहेर पडून लहान आतड्यामध्ये जाण्याची प्रक्रिया वाढवते ज्यामुळे अन्न लवकर पचते.
- मेथीदाणे: विरघळणारे फायबरने मेथी दाणे समृद्ध असून कार्बोहायड्रेटचे शोषण मंदावतात आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवतात.
- दालचिनी: इन्सुलिन सेंसिटिव्हिटी सुधारते आणि हृदयाच्या आरोग्यास मदत करते.
या पाच घटकांचे मिश्रण रक्तातील साखरची पातळी संतुलित करते, ताण कमी करते, हार्मोन्सचे संतुलन सुधारते आणि पचन व्यवस्थित करते.
मेटाबॉलिक रीसेट ड्रिंक कसे तयार कराल?
साहित्य
- धणे – अर्धा ते 1 चमचा
- मेथी – अर्धा चमचा
- सौंफ – अर्धा चमचा
- दालचिनी – ¼ चमचा
- आलं – अर्धा चमचा
- पाणी – ३०० ते ४०० मिली
पद्धत :
- सर्व साहित्य एका पातेल्यात घालून १० मिनिटे उकळा. नंतर गाळून कोमट प्या.
- सेवन करण्याचा योग्य वेळ
- रात्री झोपण्यापूर्वी १ ते १.५ तास आधी हा हर्बल ड्रिंक प्या.
यामुळे झोप चांगली येते, आतड्यातील घाण आणि यकृतामधील विषारी घटक बाहेर पडतात.
