शाळकरी मुलं म्हणजे ३ ते १४ वर्षाची मुलं. हे वय म्हणजे शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक वाढीचं अतिशय महत्त्वाचं वय. या वयात, शरीरात एखादा दोष तयार झाला, वाढीत त्रुटी राहिली आणि वेळीच दुरुस्त झाली नाही तर त्याचे दुष्परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात. प्रोटीन्स म्हणजेच प्रथिने मेंदूची वाढ आणि स्नायूंच्या बळकटीसाठी अत्यावश्यक असतात. प्रतिकारशक्ती वाढण्यासाठीही त्याचा उपयोग होतो. म्हणूनच मुलांच्या आहारात उत्तम प्रतीच्या प्रोटीन्स ची नितांत गरज असते.

१. प्रोटीन्स दूध आणि दुधाचे पदार्थ, अंडी, चिकन, मटण, मासे आणि सोयाबीन मधून मिळतात. मुलांना यापैकी २-३ पदार्थ तरी रोज आवश्यक असतात.

Perfect Brush For Healthy Teeth Why Adults Shall Use Kids Tooth Brush
तोंडाची दुर्गंधी कमी करण्यासह ‘या’ फायद्यांसाठी तुम्हीही वापरायला हवा लहान मुलांचा टूथब्रश; डॉक्टर काय सांगतात?
How to treat heat-related illnesses
उष्णतेच्या लाटेचा कसा करावा सामना? सरकारने मार्गदर्शक सुचना केल्या जारी
How To Make Gudi Padwa Sakhrechya Gathi At Home gudi padwa 2024
गुढी पाडव्यासाठी साखरेच्या गाठी यंदा बनवा घरीच, साखरेच्या बत्तास्यांची सोपी झटपट कृती
In redevelopment of flat holders Redevelopment Senior
पुनर्विकासातील ज्येष्ठ!

२. धान्य, डाळी, कडधान्य, शेंगदाणे, तीळ सारख्या तेलबिया, बदाम काजू सारखा सुकामेवा यांचं combination केलं तर त्यातूनही जास्त प्रमाणात प्रोटीन्स मिळतात.

३. मुलांच्या प्रत्येक खाण्यापिण्यातून म्हणजेच नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचा नाश्ता, रात्रीचं जेवण यातून प्रोटीन्स पुरवणारे १-२ पदार्थ हवेतच.

४. सकाळी १ मग दूध आणि ड्राय फ्रुट पावडर किंवा प्रोटीन पावडर द्यावी. उकडलेलं अंड किंवा टोफू/ सोया नगेट्स किंवा खजूर+ दाण्याचं कूट+ तीळ लाडू किंवा चीज द्यावं.

५. नाष्त्यामध्ये उकडलेली कडधान्ये किंवा दाल खिचडी किंवा वरण भात द्यावा.

६. जेवताना वरण/ आमटी/ उसळ असावी. दही पण द्यावं.

७. संध्याकाळी परत १ कप दूध आणि प्रोटीन पावडर द्यावी.

८. अधेमधे खायला, सोया नट्स/ फुटाणे/ खारे दाणे देऊ शकता.

अशा प्रकारे प्रोटीन्स दिवसभरच्या खाण्यात विभागून द्या.

व्हेज खिमा रोल

साहित्य : सोया ग्रानुल्स – १ वाटी, कांदे- २, टोमॅटो- १, आलं-लसूण-हिरवी मिरची पेस्ट- दीड चमचा, कोथिंबीर चिरून- अर्धी वाटी, लाल तिखट- अर्धा चमचा, हळद- अर्धा चमचा, गरम मसाला- १ चमचा, तेल- २ चमचे, पुदिना चटणी- २ चमचे, चाट मसाला- १ चमचा, मीठ- चवीनुसार, पोळीसाठी- गव्हाचं पीठ- २ वाट्या, तेल- अर्धा चमचा.

कृती : सारणासाठी- सोया ग्रानुल्स ४ वाट्या गरम पाण्यात १५ मिनिटे बुडवून ठेवा. कांदा, टोमॅटो चिरून घ्या. सोया मधील जास्तीचं पाणी पिळून काढून टाका. पॅनमध्ये तेलावर निम्मा कांदा सोनेरी होईपर्यंत परतून घ्या. आलं, लसूण, हिरवी मिरची पेस्ट परतून घ्या. सोया ग्रानुल्स घालून परता. हळद, लाल तिखट, गरम मसाला घाला, परता. टॉमॅटो, मीठ घालून शिजेपर्यंत परता. गॅसवरून उतरवून कोथिंबीर घाला.
पोळीसाठी कणिक भिजवून घ्या. १५ मिनिटांनी पोळी लाटून भाजून घ्या. गरम असतानाच व्हेज खिम्याचे मिश्रण, पोळीच्या मधोमध पसरा. चिरलेला कच्चा कांदा, पुदिना चटणी, चाट मसाला घाला. गुंडाळून रोल तयार करा.

सोयामधून उत्तम मूल्याचे भरपूर प्रोटीन्स मिळतात. मुलांसाठी आवश्यक सर्व पोषक घटक यातून मिळतात. नॉनवेज न खाणाऱ्यांसाठी सोया खूप चांगला पर्याय आहे. हे रोल मुलेही आवडीने खातात.

सुकेशा सातवळेकर, आहारतज्ज्ञ