गोड खाण्याने दात किडण्याचा धोका खूप जास्त असतो. पण, आता ज्या लोकांना गोड खाण्याचा आनंद लुटायचा आहे आणि दात किडण्याच्या चिंतेपासूनही दूर राहायचे आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. संशोधकांनी साखर मुक्त चॉकलेटची निर्मिती केली आहे. हे चॉकलेट दातावर पोफळी निर्माण करणा-या जीवाणूंच्या संख्येत घट करण्यास मदत करेल. बर्लिन बायोटेकचे संशोधक ख्रिस्टीन लँग आणि त्याच्या सहका-यांनी हा शोध लावला आहे.
मेडिकल एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार, हे चॉकलेट खाणा-यांच्या तोंडातील वाईट जीवाणूंचे प्रमाण कमी होण्यास मदत होऊ शकते. चॉकलेट बनवण्यासाठी वापरण्यात आलेले मृत जीवाणू हे पोफळी निर्माण करणा-या जीवाणूंवर प्रतिबंध आणतात. या परीक्षणांसाठी ६० लोकांची निवड करण्यात आली होती. त्यानुसार, हे चॉकलेट खाणा-या लोकांमधील तीन चतुर्थांश लोकांच्या दातांवरील वाईट जीवाणूंचे प्रमाण दिवसेंदिवस कमी झाल्याचे परीक्षणाअंती आढळले