Shehnaaz Gill Weight Loss: स्वतःला ‘पंजाबची कॅटरीना कैफ’ म्हणत बिग बॉसच्या घरात प्रवेश केलेली शेहनाज गिल सध्या सर्वत्र चर्चेत आहे. बिग बॉसनंतर सिद्धार्थ शुक्ला व शेहनाज गिल ही जोडी खूप गाजली होती. पण दुर्दैवाने तेव्हाच सिद्धार्थ शुक्लाचे आकस्मात निधन झाले आणि शेहनाजवर दुःखाचा डोंगरच कोसळला. बिग बॉसच्या घरात अगदी शेवटच्या दिवसापर्यंत आत्मविश्वासाने वावरलेले शेहनाज अगदी दुःखी दिसू लागली. आता कुठेतरी शेहनाजने स्वतःला सावरून पुन्हा आपल्या करिअरला वेग दिला आहे. या काळात शेहनाजने खूप वजनही कमी केले. तिच्या या ट्रान्सफॉर्मेशनमुळे एरवी फक्त क्युट म्हणून ओळख असणारी शेहनाज ही अनेकांसाठी ग्लॅमर्स स्टार सुद्धा ठरत गेली. आज आपण शहनाझच्या वजन कमी करण्याच्या प्रक्रियेतील काही महत्त्वाचे घटक जाणून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेल्थशॉट्सने दिलेल्या माहितीनुसार या वेटलॉससाठी शहनाझने तीन प्रकारच्या पाण्याचे सेवन केले होते त्यासह तिचा डाएट प्लॅन कसा होता तिने वजन कमी करताना कोणते नियम व फंडे पाळले हे सुद्धा आपण पाहणार आहोत…

शेहनाजने डाएटमध्ये ‘हे’ ड्रिंक्स ठेवले कायम…

१) हळदीचे पाणी- मीडिया रिपोर्टनुसार शेहनाजने आपल्या डाएटमध्ये कोमट पाण्यात हळद टाकून रोज सेवन केले होते. हळदीतील दाहविरोधी गुणसत्व व ऑक्सिडंट्समुळे पचनप्रक्रिया वेगाने होऊन वजन कमी करण्यास मदत होऊ शकते.

२) नारळ पाणी- नारळ पाण्याच्या सेवनाने शरीराचा मेटाबॉलिक रेट सुधारण्यास मदत होत असल्याचे म्हटले जाते, यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास विशेष मदत होऊ शकते म्हणूनच शेहनाज आपल्या आहारात नारळ पाण्याचे सेवनही करत असे.

३) ऍपल सायडर व्हिनेगर- दिवसाची सुरुवात हेल्थी ब्रेकफास्टने करताना कोमट पाण्यात ऍपल सायडर व्हिनेगर घालून प्यायल्यास शरीराला अनेक फायदे मिळू शकतात. यामुळे तुमचा चयापचय क्रियेचा वेग वाढत असल्याचेही म्हंटले जाते.

शेहनाजचे वजन कमी करण्याचे फंडे

१) सर्वात आधी तुम्हाला वजन कमी करण्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती असणे गरजेचे आहे. आजराला दूर करण्यासाठी आळस दूर करणे गरजेचे आहे.
२) तुम्ही काय खाता याच्याइतकेच तुम्ही किती खाता हे पाहणे सुद्धा महत्त्वाचे आहे. यामुळे पोर्शन कंट्रोलवर लक्ष द्यायला हवे. कोणत्याही पदार्थाचे अतिरिक्त सेवन करणे टाळावे.
३) आयुष्यात पाण्याला पर्याय नाही. तुमच्या वैद्यकीय तज्ज्ञांचं सल्ल्याने तुमच्या वजन, उंची व वयानुसार ठराविक प्रमाणात पाण्याचे सेवन नियमित करायलाच हवे.
४) जेवणाच्या आणि झोपण्याच्या वेळेत २ ते ३ तास अंतर ठेवावे.

हे ही वाचा<< परिणीती चोप्राने २८ किलो वजन कमी करताना वापरला होता ‘हा’ नियम; सकाळपासून रात्रीपर्यंत कसा होता डाएट प्लॅन?

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे, गरज भासल्यास डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्या)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shehnaaz gill weight loss how bigg boss star reduced 12 kgs with just three drinks and diet plan got hot bold look svs
First published on: 18-05-2023 at 15:47 IST