Chhatrapati Shivaji Maharaj Shivrajyabhishek Sohala Wishes: ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी १६७४ या दिवशी विधीपूर्वक राज्याभिषेक होऊन शिवराय छत्रपती झाले. रायगडावर झालेला न भूतो न भविष्यति असा ‘शिवराज्याभिषेक सोहळा’ महाराष्ट्राच्याच नव्हे तर अखंड हिंदुस्थानातील इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरला गेला. दरवर्षीप्रमाणे यंदाही तारखेनुसार ६ जूनला शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जात आहे. यंदा राज्याभिषेकाचे ३५१ वे वर्ष पूर्ण होत आहे. महाराष्ट्राचे आराध्यदैवत मानले जाणाऱ्या शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकदिनी आपणही महाराजांचे विचार स्मरणात व आचरणात आणून त्यांना मानाचा मुजरा करू शकता. त्यामुळे महाराजांचे विचार हे आपल्यापुरतेच मर्यादित न ठेवता खाली दिलेल्या शुभेच्छापत्रांच्या माध्यमातून तुमच्या मित्र व कुटुंबासहसुद्धा तुम्ही नक्कीच शेअर करू शकता. Whatsapp Status, Facebook Post, Instagram Story वरून शिवराज्याभिषेक दिन विशेष HD फोटो शेअर करायचे असल्यास आता लगेच हे खालील ग्रीटिंग्स मोफत डाउनलोड करा.

शिवराज्याभिषेक शुभेच्छा

१) ”प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रियकुलावतंस, सिंहासनाधिश्वर, महाराजाधिराज,
शिव छत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा .!!!”
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा

२) मातीसाठी प्राण सांडतो युद्ध मांडीतो ऐसा राजा
जीव वाहतो, जीव लावतो, जीव रक्षितो ऐसा राजा”
शिवराज्याभिषेक दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

३) रयतेचे रक्षण ही एकच होती मनी आस
मुघलांना वाटत होती ज्यांची भीती
असे आमचे शिवाजी राजे झाले आज ‘छत्रपती’
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

४) मराठा राजा महाराष्ट्राचा
म्हणती सारे माझा – माझा
आजही गौरव गिते गाती
ओवाळूनी पंचारती
असा आमचा “राजा शिवछत्रपती”
शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!

५) झाला तुझ्या चरणी अख्खा
महाराष्ट्र गोळा
थाटला हिंदवी स्वराज्याचा
श्री शिवराज्याभिषेक सोहळा
शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त शुभेच्छा !

६) हिंदवी स्वराज्यासाठी जिझले
रयतेसाठी सुखाचे दिवस घेऊन आले,
आई भवानीच्या आशीर्वादाने
आमचे राजे “छत्रपती” झाले!
शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्याभिषेक दिनाच्या सोहळ्याला कुठेही गालबोट लागू न देता सर्वांना हा उत्साह साजरा करता यावा यासाठी खूप खूप शुभेच्छा!