Side Effects Of Eating Refrigerated Fruits : फळं आरोग्यासाठी फायदेशीर असली तरी ती चुकीच्या पद्धतीने खाल्ली किंवा साठवली गेली, तर त्याचा तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. आजकाल बहुतेक लोक बाजारातून फळं विकत आणतात; पण ती खराब होऊ नयेत म्हणून खूप दिवस फ्रिजमध्ये ठेवतात. पण, असे केल्याने फळांमधील पौष्टिक घटक नष्ट होऊ शकतात. त्याशिवाय त्यांच्या गुणवत्तेवरही परिणाम होऊ शकतो. तसेच फळांची चव बिघडते. जर तुम्हालाही आजारी पडू नये, असे वाटत असेल, तर तुम्ही काही फळं फ्रिजमध्ये ठेवू नका.
फ्रिजमध्ये ठेवलेली ‘ही’ ५ फळं झाल्यास आरोग्यावर होतील गंभीर परिणाम (Side Effects Of Eating Refrigerated Fruits)
१) डाळिंब
डाळिंब फ्रिजमध्ये ठेवू नये. कारण- डाळिंब थंड तापमानात ठेवल्याने त्यातील पोषक घटक नष्ट होतात. ओलाव्यामुळे त्याची साल कुजू शकते. डाळिंबाचे दाणे जास्त काळ फ्रिजमध्ये ठेवल्यास ते कडक होते. मग असे डाळिंब खाल्ल्याने शरीरात अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात.
२) केळी
फ्रिजमध्ये ठेवलेले केळे खाल्ल्याने पोटात गॅसची समस्या होऊ शकते. कारण- केळी फ्रीजमध्ये ठेवल्यास थंड तापमानामुळे त्यांची पिकण्याची प्रक्रिया मंदावते. थंडीमुळे त्यातील स्टार्चचे साखरेत रूपांतरित होऊ लागते.
३) अॅव्होकॅडो
या फळात अनेक प्रकारचे पौष्टिक घटक असतात. पण, या फळात फॅटी अॅसिडचे प्रमाण जास्त आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी असते. त्यामुळे तुम्ही ते फ्रिजमध्ये ठेवता तेव्हा ते आतून खराब होऊ लागते.
४) टरबूज, कलिंगड
बरेच लोक टरबूज किंवा कलिंगड खाल्ल्यानंतर उरलेला भाग फ्रिजमध्ये ठेवतात. कापलेले टरबूज, कलिंगड फ्रिजमध्ये ठेवणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. कारण- थंडीमुळे त्यात असलेले लायकोपीन आणि बीटा-कॅरोटीनसारखे अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण कमी होऊ लागते.
५) अननस
अननस फ्रिजमध्ये ठेवल्यास ते कडू होऊ शकते. म्हणून ते खोलीच्या तापमानावर ठेवावे. डाळिंब फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यातील गोडवा कमी होऊ शकतो. म्हणून कोणतेही फळ रेफ्रिजरेटरमध्ये ठेवण्याऐवजी रूममधील तापमानात ठेवावीत.