Silver Jwellery Cleaning: चांदीच्या दागिन्यांची आवड अनेकांना असते. मात्र, चांदीचे दागिने जसे परिधान करायला आवडतात, तसेच ते लवकर काळे देखील पडतात. त्यानंतर ते घालायला देखील खराब वाटतात. विशेषतः महिलांना चांदीच्या अंगठ्या किंवा पायाच्या अंगठ्या घालायला आवडतात. मात्र, काळ्या पडल्यांनंतर ते पायात खराब दिसतात. चांदीचे दागिने लवकर खराब होण्याचे कारण म्हणजे, हवा. चांदीच्या वस्तू जेव्हा हवेच्या संपर्कात येताच त्यांची चमक जाऊ लागते आणि नंतर काळे होण्यास सुरुवात होते. चांदीची जुनी चमक परत आणणे एवढे सोपे नाही. त्यासाठी असे काही उपाय आहेत, ज्यामुळे चांदीची चमक पुन्हा येऊ शकते. त्यामुळे जर चांदी काळी पडली तर ती घेऊन ज्वेलर्सभोवती फिरू नका. काही घरगुती टिप्स वापरून तुम्ही चुटकीसरशी चांदीची चमक वाढवू शकता.

चांदीचे दागिने स्वच्छ करण्याच्या सोप्या टिप्स

१)टूथपेस्टने स्वच्छ करा

चांदीला चमक देण्यासाठी, तुम्ही टूथपेस्टचा वापर करू शकता. यासाठी, चांदीच्या दागिन्यांवर टूथपेस्टचा लेयर लावा आणि काही वेळ राहू द्या. त्यांनंतर जुना टूथब्रश घ्या आणि आता चांदीची वस्तू टूथब्रशने हलके घासून घ्या आणि त्यांनंतर धुवून टाका. त्यांनंतर थोड्याच वेळात तुम्हाला चांदी चमकताना दिसेल. त्यानंतर तुम्ही चांदीचे दागिने परिधान करू शकाल.

Health Benefits of Avocado
झपाट्याने वजन कमी करणारे हिरव्या रंगाचे ‘हे’ फळ कापण्यापूर्वी स्वच्छ धुवा; तज्ज्ञ म्हणतात, अन्यथा पडेल महागात
Bombil Khengat Recipe In Marathi bombil fish recipe in marathi
“बोंबलाचे खेंगाट” गृहिणींनो ‘ही’ रेसिपी एकदा नक्की ट्राय करा; केस गळती होईल कायमची दूर
Why are naphthalene balls kept with clothes to be put away How do you use naphthalene balls in a wardrobe
कपड्यांमधील ओलसरपणा, कुबट वास होईल गायब; कपाटात ठेवा ‘ही’ गोळी, जाणून घ्या वापराची योग्य पद्धत
homemade mango ice cream recipe
Mango Ice-cream: मुलांसाठी घरच्या घरी बनवा आंब्याचे थंडगार आइस्क्रीम! वापरा फक्त ‘हे’ तीन पदार्थ

२) व्हिनेगर मध्ये भिजवून ठेवा

हा उपाय करण्यासाठी चांदीचे दागिने व्हिनेगरमध्ये काही वेळ भिजवून ठेवा. त्यांनंतर थोडा वेळ तसच राहू द्या. काही वेळानंतर ब्रशने दागिने घासून घ्या. तुमचे दागिने चमकून जातील. तसच जर तुम्हाला चांदीची भांडी चमकवायची असतील तर व्हिनेगरमध्ये थोडासा बेकिंग सोडा घाला आणि त्यामध्ये चांदीची भांडी ठेवा. या मिश्रणात चांदी साधारण २ ते ३ तास ​​भिजत ठेवा. त्यानंतर ती भांडी काढा आणि ते काढा नंतर ब्रशने धुवा.

३) कोका कोलाचा उपयोग

जर तुम्हाला कमी वेळात अंगठी चमकवायची असेल तर ती कोकाकोलामध्ये भिजवून ठेवा. कोका-कोला अवघ्या दहा मिनिटांत प्रभाव दाखवते. कोका-कोलामध्ये भिजलेली चांदी कोमट पाण्याने धुवा आणि कापडाने पुसून टाका. चांदी एकदम नवीन दिसेल आणि त्यानंतर लवकर काळी देखील पडणार नाही.

४) ॲल्युमिनियम फॉइल बेअरिंग

यासाठी एक भांडे ॲल्युमिनियम फॉइलने चांगले झाकून ठेवा. त्या भांड्यात गरम पाणी भरा. त्यांनंतर त्यात मीठ आणि बेकिंग सोडा घालून पेस्ट किंवा मिश्रण तयार करा. या पाण्यात चांदीची भांडी किंवा दागिने टाका. ही भांडी थोडा वेळ भिजवू द्या. नंतर स्वच्छ पाण्याने धुवा आणि कापडाने पुसून टाका. भांडी चमकून जातील.

५) बेकिंग सोडा

यासाठी बेकिंग सोड्यामध्ये पाणी मिसळून घट्ट पेस्ट बनवा. या पेस्टने चांदी चांगली पॅक करा. चांदीवर बेकिंग सोडा किमान ५ मिनिटे असाच राहू द्या. नंतर चांदीला पाण्याने धुवून कपड्याने स्वच्छ करा, चांदीची चमक परत येईल.