बदलत्या ऋतूत त्वचेशी संबंधित आजार होतात. या ऋतूमध्ये त्वचेवर खाज सुटणे, पुरळ येण्याची समस्या खूप असते. चेहऱ्यावर घाम आणि तेलामुळे पुरळ येतात. या ऋतूत त्वचेच्या संसर्गाचा धोकाही जास्त असतो. बदलत्या ऋतूत त्वचेच्या समस्या टाळण्यासाठी तुळशीचा पॅक खूप प्रभावी ठरतो.तुळशीचे रोप सहसा प्रत्येक घरात असते. औषधी गुणांनी परिपूर्ण असलेली तुळशीमध्ये पोषक तत्वांचा भरणा आहे, याच्या वापराने आरोग्याला तर फायदा होतोच पण ती त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. तुळशीच्या गुणधर्मामुळे सौंदर्य उत्पादनांमध्ये त्याचा वापर केला जातो.

तुळशीचे त्वचेचे फायदे

तुळशीमध्ये असलेले अँटीबॅक्टेरियल, अँटीसेप्टिक आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म त्वचेला कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून वाचवतात. तुळशीचा पॅक रक्ताभिसरण नियंत्रित करतो. हे खराब झालेल्या पेशी आणि ऊतकांची दुरुस्ती करून पर्यावरणाच्या नुकसानापासून त्वचेचे संरक्षण करते. त्वचेवर बॅक्टेरिया वाढण्यापासून प्रतिबंधित करते, तसेच मुरुमांपासून मुक्त होते. या पॅकचा वापर केल्याने त्वचेच्या सुरकुत्या, बारीक रेषा, काळे डाग, मुरुमांसारख्या अनेक समस्यांपासून सुटका मिळते. तुळशी नैसर्गिक सौंदर्य वाढवते आणि त्वचेला अनेक प्रकारच्या संसर्गापासून वाचवते.

This is what happens when you chew cloves everyday
रोज एक-दोन लवंग चघळल्या तर शरीरावर काय परिणाम होईल? तज्ज्ञांकडून जाणून घ्या उत्तर…
Health Special, Doctor,
Health Special: डॉक्टर गुगलचे फायदे अधिक की, तोटे? काय कराल? काय टाळाल?
How to clean Cooler at home
Jugaad Video: कुलर सुरु करण्याआधी ‘हा’ सोपा जुगाड करुन पाहा; मिनिटांत होईल तुमचा कुलर स्वच्छ, कुबट वास येणार नाही!
article about bedwetting problem among children
Health Special: अंथरूण ओले का होते? उपाय काय?

(हे ही वाचा: Skin Care Tips: टॅनिंगने त्रस्त आहात? तर ‘या’ ३ टिप्स करा फॉलो)

तुळशीचा पॅक बनवण्याचे साहित्य

१ चमचा तुळशी पावडर

एक चमचा मुलतानी माती

एक चमचा चंदन पावडर

ऑलिव्ह ऑइलचे चार थेंब

पाच थेंब गुलाबजल

पॅक कसा तयार करायचा?

एक वाटी घ्या आणि त्यात तुळशी पावडर, मुलतानी माती, चंदन पावडर, ऑलिव्ह ऑईल आणि पाच थेंब गुलाबजल घाला. सर्व साहित्य चांगले मिसळा. याची पेस्ट बनवण्यासाठी तुम्ही त्यात पाण्याचे काही थेंब टाकून मिक्स करा. नीट पेस्ट मिक्स करा जेणेकरून त्यात गुठळ्या होणार नाहीत.

(हे ही वाचा: Health Insurance: आरोग्य विमा घेणे का महत्त्वाचे आहे? जाणून घ्या)

कसा लावावा पॅक ?

तयार केलेली पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर आणि मानेवर समान रीतीने लावा आणि कोरडे होऊ द्या. साधारण ३० मिनिटांनी चेहरा धुवा. चेहरा धुण्यासाठी थंड पाण्याचा वापर करणे लक्षात ठेवा.