प्रत्येक माणसाला सुंदर दिसण्याची इच्छा असते. चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी आपण विविध प्रकारचे कॉस्मेटिक उत्पादने वापरतो, तसेच चेहऱ्यावर अनेक प्रकारचे उपचार करतो, तरीही हवे असलेले सौंदर्य प्राप्त होत नाही. पण तुम्हाला माहित आहे की सुंदर दिसण्यासाठी सुंदर त्वचा असणे आवश्यक आहे. वाढते प्रदूषण, सूर्याची हानिकारक किरणे आणि खराब आहार यांचा परिणाम आपल्या त्वचेवर स्पष्टपणे दिसून येत आहे. त्वचा कोरडी आणि निर्जीव होते.

बदलत्या ऋतूमध्ये त्वचेवर टॅनिंगची समस्या खूप त्रासदायक बनते. टॅनिंग दूर करण्यासाठी केवळ कॉस्मेटिक उत्पादने वापरणे पुरेसे नाही तर काही घरगुती आणि प्रभावी उपाय वापरणे देखील आवश्यक आहे. टॅनिंग घालवण्यासाठी कोणते प्रभावी उपाय वापरले जाऊ शकतात ते जाणून घेऊया.

केशर वापरा

केशरमध्ये फायबर, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, मॅंगनीज, लोह, प्रथिने, व्हिटॅमिन ए, सी यांसारख्या आवश्यक पोषक तत्वांचा समावेश असतो, जे आरोग्यासाठी तसेच त्वचेसाठी फायदेशीर असतात. सन टॅन घालवण्यासाठी केशर दुधात भिजवून वापरता येते. चेहऱ्यावर केशराचे धागे लावल्याने टॅनिंग दूर होईल आणि त्वचा चमकदार होईल.

(हे ही वाचा: Amazon Sale 2022: स्वस्तात आणि बंपर डिस्काउंटसह घरगुती वस्तू करा खरेदी!)

दही आणि हळदीचा पॅक लावा

जर तुम्हाला त्वचेवरील टॅनिंग काढायचे असेल तर दही आणि हळदीचा पॅक लावा. दह्यात प्रोबायोटिक्स असतात जे त्वचेला मॉइश्चरायझ करतात आणि त्वचेला चमक देतात. दही आणि हळदीचा पॅक बनवण्यासाठी एका भांड्यात दही घ्या आणि त्यात एक चमचा हळद घाला आणि चांगले मिसळा. ही पेस्ट चेहऱ्यावर २० मिनिटे लावून पाण्याने धुवा, त्वचा चमकदार दिसेल.

(हे ही वाचा: Health Insurance: आरोग्य विमा घेणे का महत्त्वाचे आहे? जाणून घ्या)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बेसन पॅक लावा

त्वचेवरील टॅनिंग काढण्यासाठी तुम्ही बेसनाचाही वापर करू शकता. बेसनाचा पॅक बनवून तुम्ही वापरू शकता. यासाठी एका भांड्यात तीन चमचे बेसन घ्या आणि त्यात एक चमचा ऑलिव्ह ऑईल, लिंबाचा रस आणि थोडी हळद घालून चांगले मिक्स करा. ही पेस्ट चेहऱ्यावर १५ मिनिटे लावून पाण्याने चेहरा धुवा, चेहरा चमकदार दिसेल.