scorecardresearch

Smart Kitchen Tips: दुधावर घट्ट साय हवी तर या 5 सोप्या टिप्स नक्की वापरा

आपल्याकडे अनेक घरांमध्ये साजूक तूप घरीच बनवले जाते त्यासाठी दुधाच्या सायीवरच प्रक्रिया केली जाते.

Smart Kitchen Tips: दुधावर घट्ट साय हवी तर या 5 सोप्या टिप्स नक्की वापरा
Smart Kitchen Tips (फोटो: संग्रहित)

Kitchen Tips In Marathi: दूध, दही, तूप अशा सर्वच दुग्धजन्य पदार्थांवर जीएसटी लागू झाल्यापासून या रोजच्या वापरातील वस्तूंचे भाव वधारले आहेत. अशावेळी तुमचं महिन्याचं बजेट बिघडू नये असं वाटत असेल तर कमीत कमी खर्चात अधिकाधिक फायदा घेण्याचे फंडे वापरणे हा एकमेव मार्ग आहे. आपल्याकडे अनेक घरांमध्ये साजूक तूप घरीच बनवले जाते यासाठी दुधाची साय काढून मग त्यावर प्रक्रिया केली जाते. सहसा म्हशीच्या दुधावर गायीच्या दुधापेक्षा अधिक घट्ट मलाई मिळते मात्र याने चवीत थोडा फरक पडतो म्हणूनच अनेक जण गायीच्या दुधापासून बनलेल्या तुपाला अधिक प्राधान्य देतात. तुम्हाला जर गायीच्या दुधावर सुद्धा घट्ट साय किंवा मलाई काढायची असेल तर तुम्ही या लेखात दिलेल्या स्मार्ट किचन टिप्स नक्की वापरून पहा.

Monsoon Recipes: पावसाळ्यात ‘या’ रानभाज्यांचा बेत होऊदे! Viral Couple ‘प्रसिका’ ने सुद्धा शेअर केला Video, पहा

दुधावर घट्ट साय कशी काढावी?

  1. दुधाला उकळी आल्यावर किंवा त्याआधी गॅस बंद करणे हे आपल्याकडे मोठं टास्क समजलं जातं. पण जर का तुम्हाला अधिक सायीचं दूध हवं असेल तर दूध अधिक तापवणं गरजेचं आहे.
  2. जर का दूध उतू जात असेल तर आपण वर आलेली साय बाजूला करून पुन्हा दूध तापवू शकता. साधारण १५ ते २० मिनिट तरी दूध उकळू द्या.
  3. दूध उकळताना गॅस मंद आचेवर ठेवा.
  4. दूध तापवल्यावर ते लगेचच फ्रीज मध्ये ठेवू नका १० ते १५ मिनिटे दूध बाहेर तसंच उघडं राहू द्या.
  5. जर का दुधात काही पडेल अशी भीती असेल तर झाकण म्हणून एखादी चाळणी ठेवा.

आता एक महत्त्वाची गोष्ट दूध तापवताना आपण चमच्याने साय काढून घेत असाल तर हरकत नाही पण एकदा का गॅस बंद केला की निदान १५ मिनिट दुधाचं भांडं हलवू नका.

घरच्या कुंडीत करा आल्याची लागवड; फॉलो करा ‘या’ सोप्या स्टेप्स

याशिवाय दूध फ्रीज मध्ये ठेवताना आपण जागा कमी म्हणून एकावर एक भांडी ठेवता. पण दुधाच्या भांड्यावर चुकूनही कांदा,वाटपाच्या मसाल्याचा डब्बा, आलं लसूण पेस्टचा डब्बा ठेवू नका यामुळे दूध फाटण्याची शक्यता असते. आणखीन एक स्मार्ट टीप म्हणजे अधिक उकळताना जर का तुम्हाला भांडं करपण्याची भीती असेल तर भांड्याच्या तळाशी थोडं पाणी टाका.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या