Smell from Urine Reason: आपलं शरीर जेव्हा एखाद्या समस्येशी झुंजत असतं, तेव्हा ते अनेकदा छोटे-छोटे संकेत देऊन आपल्याला इशारा करत असतं. अशाच संकेतांपैकी एक आहे – लघवीतून येणारी तीव्र किंवा विचित्र दुर्गंधी. बरेच लोक हे दुर्लक्ष करतात, असं वाटतं की कदाचित पाणी कमी प्यायलो असेल किंवा काही तिखट खाल्लं असेल. पण ही दुर्गंधी कधी-कधी गंभीर आजारांचे लक्षणही असू शकतं.
डॉ. सुप्रिया पुराणिक सांगतात की लघवीच्या वासात बदल होणे फक्त आहारामुळेच होत नाही, तर कधी कधी हे शरीरात लपलेला संसर्ग किंवा कोणत्यातरी अवयवाशी संबंधित गंभीर त्रासाचं लक्षणही असू शकतं. त्यामुळे अशा गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यास आरोग्यावर पुढे जाऊन वाईट परिणाम होऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया लघवीला दुर्गंधी येण्यामागची ५ शक्य कारणं…
युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन (UTI)
महिलांमध्ये सगळ्यात साधारण कारणांपैकी एक म्हणजे युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन. या संसर्गात लघवीतून दुर्गंधी येण्यासोबतच जळजळ, वारंवार लघवी आणि ओटीपोटात दुखण्यासारखे त्रास होतात.
- लघवी करताना जळजळ
- वारंवार लघवी
- गडद रंगाची लघवी
- लघवीतून वास येणे
डिहायड्रेशन (Smelly Urine Reason Causes)
जेव्हा शरीरात पाण्याची कमतरता होते, तेव्हा लघवी गडद आणि पिवळ्या रंगाची होते, आणि त्यामुळे तीव्र वास येऊ लागतो.
- तोंड कोरडं पडणं
- चक्कर येणं
- थकवा
- गडद पिवळ्या रंगाची लघवी
डायबिटीज
डायबिटीस असलेल्या लोकांमध्ये जेव्हा रक्तातील साखरेची मात्रा खूप वाढते, तेव्हा लघवीतून फळांसारखा गोड किंवा विचित्र वास येऊ लागतो. याला डायबेटिक कीटोऍसिडोसिस म्हणतात, आणि ही एक वैद्यकीय आपत्कालीन स्थिती असू शकते.
- जास्त तहान लागणे
- वारंवार लघवी होणे
- श्वासात विचित्र वास येणे
- थकवा आणि गोंधळ जाणवणे
लिव्हरशी जोडलेल्या समस्या
जेव्हा लिव्हर नीट काम करत नाही, तेव्हा शरीरातील विषारी पदार्थ (टॉक्सिन्स) बाहेर पडत नाहीत, त्यामुळे लघवीचा वास बदलतो.
- डोळे आणि त्वचा पिवळी पडणे
- पोटात सूज
- भूक न लागणे
- गडद रंगाची लघवी
काही औषधे आणि सप्लीमेंट्सचा परिणाम
कधीकधी व्हिटॅमिन बी६, अँटीबायोटिक्स किंवा काही औषधांमुळे देखील लघवीचा वास बदलतो.
- लघवीचा रंग आणि वास या दोघांमध्ये बदल
- दुसरा कोणता आजार नसताना असा बदल जाणवणे
लघवीला दुर्गंधी येत असेल तर काय केलं पाहिजे…
- पाणी खूप प्या
- स्वच्छतेची काळजी घ्या
- मसालेदार किंवा जास्त प्रथिने असलेले पदार्थ मर्यादित करा
- लक्षणे कायम राहिल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या