आपल्या मनात आई-वडिलांविषयी असणारे प्रेम सांगता येत नाही. त्यांची मनातली जागा ही केवळ ज्याची त्यालाच माहित असते. फाडर्स डे सारखे सारखे दिवस साजरे केले तर अनेकजण पाश्चात्य संस्कृतीविषयी ओरड करतात मात्र वडिलांवरचे प्रेम व्यक्त करण्यासाठी असा एखादा दिवस सेलिब्रेट केला तर काय हरकत आहे. यासाठी बाजारातही वेगवेगळ्या ऑफर्सची चलती असल्याचे दिसते.
ऑनलाईन खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढत असतानाच ऑनलाईन कंपन्याही वेगवेगळ्या निमित्ताने ऑफर्स जाहीर करत आपल्या ग्राहकांना आकर्षित करतात. १८ जून रोजी असणाऱ्या ‘फादर्स डे’च्या निमित्ताने फ्लिपकार्टनेही Flipkart अशीच एक ऑफर जाहीर केली आहे. ८ जून ते १० जून रोजी ही ऑफर उपलब्ध असून जास्तीत जास्त जणांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन कंपनीने केले आहे. यामध्ये आयफोन ६ (१६ जीबी) हा मोबाईल कमी किंमतीत मिळणार आहे. २_,९९९ इतकी या मोबाईलची किंमत असेल असे जाहीर कऱण्यात आले आहे. मात्र नेमकी किंमत कंपनीने गुलदस्त्यात ठेवली आहे. सध्या फ्लिपकार्टवर हा फोन २४,९९० रुपयांना उपलब्ध असून फादर्स डेच्या निमित्ताने तो त्याहूनही कमी किंमतीला उपलब्ध होणार आहे.
याशिवाय अॅपलचा आयफोन ६ (३२ जीबी) २४,९९० रुपयांना उपलब्ध आहे. आपल्याकडील जुना फोन देऊन हा फोन घेतल्यास त्यावरही कंपनीकडून घसघशीत सूट देण्यात येत आहे. ईएमआयवर हा फोन घेतल्यास ग्राहकाला दर महिन्याला ४,१६५ रुपये भरावे लागणार आहेत. जे ग्राहक २५ हजारांहून जास्त किंमत मोजू शकतात. त्यांच्यासाठी वन प्लस ३ टी हा एक चांगला पर्याय असू शकतो. ६४ जीबीचा हा फोन २९,९९९ रुपयांना असून १२८ जीबीचा फोन ३४,९९९ रुपयांना आहे. मात्र १२८ जीबीचा फोन अद्याप भारतात उपलब्ध झालेला नाही.
त्यामुळे आपल्या वडिलांना खास भेटवस्तू देऊन हा दिवस साजरा करायचा असणाऱ्यांसाठी ही नक्कीच चांगली संधी ठरणार आहे. याशिवाय इतर ऑनलाईन पोर्टल्सवरही अशाप्रकारच्या ऑफर्स देण्यात आल्या आहेत.