व्यायाम करणे आरोग्यासाठी खूप उपयुक्त मानले जाते. मात्र, जर हाच व्यायाम तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर किंवा अगदी मित्रांसह केलात, तर त्यातून तुमचे आरोग्य उत्तम राहील. त्याचबरोबर तुमच्या साथीदारांसह अधिक चांगले संबंध निर्माण होतील. एकमेकांवरील विश्वास वाढेल, तसेच एकमेकांसोबत सुंदर ताळमेळ बसण्यास मदत होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“जोडीदारासह किंवा साथीदारासह व्यायाम केल्याने त्याचा फायदा केवळ आरोग्यावरच होत नाही; तर दोन व्यक्तींमधील संवाद सुधारणे, एकमेकांवरील विश्वास वाढणे, एकमेकांना समजून घेण्यासाठीही होतो. ‘पार्टनर योगा’ केल्याने तुम्ही ज्या व्यक्तीसह मिळून व्यायाम करीत आहात, त्याच्याबरोबरचे नाते अधिक खुलून येण्यास मदत होते,” असे काहीसे अक्षर योगा केंद्राचे संस्थाप, हिमालयीन सिद्ध अक्षर यांनी सांगितले असल्याची माहिती ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या एका लेखावरून मिळते.

हेही वाचा : योगा डाएट : आसनांचा आरोग्याला पुरेपूर फायदा व्हावा यासाठी आहार कसा असावा? पाहा या पाच टिप्स….

तुम्हाला जर तंदुरुस्त राहायचे असेल, वजन कमी करायचे असल्यास जोडीदारासह मिळून कोणती योगासने करू शकता, ते पाहा.

१. बॅक टू बॅक चेअर पोज [Back-to-Back Chair Pose]

या आसनामध्ये दोघांनी पाठीला पाठ लावून उभे राहावे आणि खुर्चीत बसतो त्याप्रमाणे गुडघ्यात वाकून खाली जावे. तुम्हाला जमेल तितका वेळ या आसनात राहावे.
असे करीत असताना दोहोंची पाठ एकमेकांना चिकटलेली राहील याकडे लक्ष द्यावे.

२. वृक्षासन

या आसनामध्ये दोघांनी बाजूबाजूला किंवा समोरासमोर उभे राहावे.
उजव्या पायाचे पाऊल, स्वत:च्या डाव्या पायाच्या मांडीला लावावे.
दोन्ही हातांचे तळवे एकमेकांना चिकटवून सरळ रेषेत डोक्याच्या वर न्यावे. तुम्हाला जमेल तितका वेळ त्या आसनामध्ये राहावे.
दोघांनी नंतर पाय बदलून पुन्हा तीच क्रिया करावी.

३. पार्टनर बोट पोज [partner boat pose]

दोघांनी एकमेकांकडे तोंड करून, पाय पसरून बसावे.
उजव्या पायाचे पाऊल जमिनीवर ठेवावे. जोडीदाराने डाव्या पायाचे पाऊल जमिनीवर ठेवावे.
तुमचे डाव्या पायाचे पाऊल जोडीदाराच्या उजव्या पावलाला चिकटवा.
एकमेकांचे हात धरून, एकमेकांच्या पावलांना चिकटवलेले पाय शक्य तितके वर नेऊन V किंवा A असा आकार बनवावा.
हीच क्रिया दुसऱ्या पायासोबत करावी.

हेही वाचा : वजन घटवण्यासाठी आहार कमी, कार्डिओ जास्त? स्त्रियांनो तुम्हीही करत आहात का ‘या’ चुका? पाहा तज्ज्ञांचा सल्ला…

४. पार्टनर ट्विस्ट पोज

एकमेकांसमोर मांडी घालून बसा. स्वतःचे गुडघे जोडीदाराच्या गुडघ्याला चिकटू द्यावेत.
आता तुमचा उजवा हात आणि जोडीदाराने डावा हात मागे न्यावा.
दोघांनी एकमेकांचे पाठीमागे नेलेले हात दुसऱ्या हाताने पकडावेत.
म्हणजे तुमचे सर्व शरीर ‘ट्विस्ट’ होण्यास मदत होईल.

ही चार आसने करण्यास सोपी आहेत. जोडीदारासह करण्यासाठी सोप्या आसनासह अवघड आसनाचे अजून कितीतरी प्रकार आहेत. एकत्र व्यायाम केल्याने वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते आणि जोडीदारासह वेळही व्यतीत करता येतो. तसेच एकमेकांबरोबरचे नाते अधिक चांगले होण्यास मदत होते.

[टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे. कृपया त्यास वैद्यकीय सल्ला समजू नये.]

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stay fit and healthy with these 4 couple yoga poses it will make your bond more stronger checkout dha
First published on: 27-01-2024 at 18:43 IST