How to stop moisture in kitchen: पावसाळ्यात भाज्या जास्त काळ साठवण्यात खूप अडचणी येतात. या ऋतूमध्ये भाज्या कुजण्यास आणि लवकर खराब होण्यास सुरुवात होते. अनेक वेळा पावसाच्या पाण्यात भिजल्यामुळे भाज्यांचे आयुष्य कमी होते. अशा परिस्थितीत बाजारातून वारंवार भाज्या खरेदी करण्याची गरज असते; तर काही खास टिप्स वापरून तुम्ही पावसात भाज्या बराच काळ ताज्या ठेवू शकता.
भाज्या योग्यरित्या साठवा
पावसाळ्यात पालक, शेपू, मेथी यांसारख्या पालेभाज्या जास्त ओलावा शोधून घेतात, ज्यामुळे त्या लवकर खराब होऊ लागतात. अशा परिस्थितीत साठवण्यापूर्वी त्या धुण्याऐवजी तुम्ही त्या कोरड्या कापडाने हलके पुसू शकता किंवा कागदात गुंडाळू शकता. तुम्ही त्या हवाबंद डब्यातदेखील ठेवू शकता.
यामुळे भाज्या लवकर कुजतात
अनेक जण भाज्या खरेदी करतात तेव्हा त्या लगेच धुवून फ्रिजमध्ये ठेवतात. अशा परिस्थितीत त्यातील ओलावा वाढतो, ज्यामुळे त्या लगेच खराब होतात.
या भाज्या वेगवेगळ्या ठिकाणी ठेवा
बटाटे, कांदे आणि लसूण यांसारख्या भाज्या एकत्र ठेवू नयेत. त्या कागदी पिशवीत किंवा टोपलीमध्ये झाकून ठेवा.
खराब झालेल्या भाज्या लगेच काढून टाका.
जर कोणतीही भाजी कुजलेली दिसली तर ती ताबडतोब फेकून द्या. खरंतर तुम्ही या भाज्यांमधून कुजलेली भाजी काढली नाही तर इतर भाज्यादेखील खराब होऊ लागतात.