Healthy Summer Drinks Recipes : ड्रॅगन फ्रूट हे विविध आजारांवर गुणकारी मानले जाते. त्यामुळे आजारी व्यक्तींना ड्रॅगन फ्रूट खायला दिले जाते. या फळामध्ये कॅलरी कमी आणि फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स जास्त असते. या फळाला स्ट्रॉबेरी पिअर किंवा पिताया म्हणूनही ओळखले जाते. हे फळ विविध पोषक घटनांचा एक खजिना आहे. त्यामुळे केवळ आजारी व्यक्तीच नाही तर अनेक जण आवडीने हे फळ खातात. यात आता उन्हाळा सुरू होत आहे, अशा स्थितीत तुम्ही ड्रॅगन फ्रूटपासून थंडगार ज्यूस बनवून पिऊ शकता. पण, ड्रॅगन फ्रूटपासून थंडगार ज्यूस कशा पद्धतीने बनवायचा याची रेसिपी जाणून घेऊ….

ड्रॅगन फ्रूट ज्यूस बनवण्यासाठी लागणारे साहित्य

१) ड्रॅगन फ्रूट – १ चिरलेला
२) लिंबू – अर्धा
३) पुदिना – ५, ६ पानं
४) काळे मीठ – अर्धा टीस्पून
५) साखर – १ वाटी
६) काळी मिरी पावडर – अर्धा टीस्पून
७) सोडा बाटली – २५० मिली
८) पाणी
९) बर्फाचे तुकडे

Dubai sky transforms to green viral video
बापरे! हिरव्या रंगाचे ढग आले दाटून! पाहा, दुबईतील वादळाचा धडकी भरवणारा Video…
Nashik heats up temperature at 40.4 degree Celsius but sprinkles of rain in some areas
नाशिक तापले… पारा ४०.४ अंशावर, काही भागात पावसाचा शिडकावा
How to make raw mango juice premix
उन्हात न वाळवता बनवा कैरी सरबत प्रीमिक्स, फ्रिजशिवाय टिकणारी कैरी सरबत पावडर कशी बनवावी? ही घ्या रेसिपी
Summer Special Sabudana Batata Recipe
फक्त १ वाटी साबुदाणा-१ बटाटा आणि तोंडात घालताच विरघळणारे उपासाचे पापड, १५ मिनिटतात ५० पापडाची सोपी कृती

ड्रॅगन फ्रूट ज्यूस बनवण्याची कृती

सर्वप्रथम ड्रॅगन फ्रूट नीट सोलून घ्या. नंतर त्याचे बारीक छोटे तुकडे करून एका भांड्यात काढा. यानंतर ग्लासच्या मदतीने ड्रॅगन फ्रूटचे एकदम बारीक पल्प तयार करा. हवे असल्यास ड्रॅगन फ्रूट मिक्सर ग्राइंडरमध्ये टाकूनही तुम्ही हा पल्प तयार करू शकता. यानंतर लिंबाचा रस, साखर काळे मीठ आणि वर नमूद केलेले सर्व पदार्थ त्यात मिक्स करा. आता हे सर्व मोठ्या जारमध्ये टाका, त्यानंतर त्यात बर्फाचे तुकडे आणि सोडा घालून चांगलं मिक्स करा. अशाप्रकारे तुमचा थंडगार ड्रॅगन फ्रूट ज्यूस तयार आहे.