scorecardresearch

Summer Tips : वीजेशिवायही उन्हाळ्यात घर ठेवता येणार थंड; ‘या’ टिप्सचा वापर ठरेल उपयुक्त

देशातील प्रत्येक घरात सध्या दिवसरात्र पंखे आणि एसी सुरु आहेत. परंतु सर्वात जास्त त्रास तेव्हा होतो जेव्हा घरातील वीज पुरवठा खंडित होतो.

Summer Tips : वीजेशिवायही उन्हाळ्यात घर ठेवता येणार थंड; ‘या’ टिप्सचा वापर ठरेल उपयुक्त
आज आपण असे उपाय जाणून घेणार आहोत ज्यामुळे वीजेशिवायही आपण आपले घर थंड ठेवू शकतो. (Photo : Pexels)

सध्या संपूर्ण देशात गरमीमुळे लोक हैराण झाले आहेत. या उन्हात घराबाहेर पडणे कठीण जात आहे. परंतु घरातही उष्णतेचे प्रमाण काही कमी नाही. देशातील प्रत्येक घरात सध्या दिवसरात्र पंखे आणि एसी सुरु आहेत. परंतु सर्वात जास्त त्रास तेव्हा होतो जेव्हा घरातील वीज पुरवठा खंडित होतो. अशावेळी काय करावे हेच सुचत नाही. तुम्हालाही ही समस्या भेडसावते का? आज आपण असे उपाय जाणून घेणार आहोत ज्यामुळे वीजेशिवायही आपण आपले घर थंड ठेवू शकतो.

घरात ज्या दिशेने ऊन येते तिथे कॉटनचे डबल पडदे लावावेत. नेट, फाइन कॉटन किंवा शिफॉन हे कापड असेल तर उत्तम. या कपड्यांमधून थंडावा पसरतो. खिडक्यांचे पडदे काढून तुम्ही बांबू चिक ब्लाइंड्स लावू शकता. कडक उन्हाळ्यात ते दुपारी बंद ठेवा आणि सकाळी आणि संध्याकाळी उघडा, जेणेकरून हवा खेळती राहील.

Solo trip च्या वेळी नक्की फॉलो करा ‘या’ टिप्स; प्रवास होईल अधिक सोपा आणि आरामदायक

जेव्हा घरातील वीज पुरवठा खंडित होतो तेव्हा स्वयंपाक घरात काम करणे टाळावे. अशावेळी स्वयंपाक केल्याने घरातील उष्णता वाढते. तुमच्या बेडवर हलक्या रंगाच्या चादरी घालाव्यात.

जर तुमच्या घरात गालिचा असेल तर तो काढून टाका. गालिचे आपली खोली थंड ठेवण्यास मदत करत नाहीत. याउलट ते जमिनीमधील उष्णता अडवून खोली आणखीनच उष्ण करतात.

घरामध्ये गडद पडदे, बेडशीट किंवा इतर कपडे वापराने टाळावे. हे खोली थंड करण्यास मदत करत नाहीत. दुपारी खिडक्या बंद ठेवाव्यात. असे केल्याने ३०% उष्णता कमी होते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-05-2022 at 11:53 IST

संबंधित बातम्या