चहा हा प्रत्येकाच्या दिनचर्येचा एक महत्त्वाचा भाग आहे. भारतात सकाळी उठल्यानंतर अनेक जण चहाने दिवसाची सुरुवात करतात पण तुम्हाला माहिती असेल चहा-कॉफी आपल्या आरोग्यासाठी चांगले नाही. अनेकदा डॉक्टरसुद्धा चहा कॉफी सोडण्याचा सल्ला देतात पण त्याऐवजी सकाळी उठल्यानंतर काय प्यायचं हा प्रश्न पडणे साहजिक आहे पण आज आम्ही तुम्हाला एक बेस्ट पर्याय सांगणार आहोत.

सकाळी उठल्यानंतर चहा कॉफी नाही तर मॉर्निंग ड्रिंक तुम्ही घेऊ शकता. मॉर्निंग ड्रिंकच्या मदतीने चयापचय संतुलित करण्यास आणि वजन कमी करण्यास मदत करते.

हळद आणि काळी मिरी

एक ग्लास कोमट पाण्यात हळद आणि काळी मिरी टाका आणि सकाळी उठल्यानंतर हे पाणी प्या. यामुळे तुमच्या शरीराचे चयापचय संतुलित राहील आणि जास्तीचे फॅट्स कमी होऊ शकतात.

ओवा आणि जिऱ्याचे पाणी

सकाळी उठल्यानंतर पाण्यामध्ये ओवा आणि जिरे घाला आणि मंद आचेवर पाणी उकळा. त्यानंतर हे पाणी गाळून प्या. यामुळे पचनाशी संबंधीत समस्या दूर होऊ शकतात आणि वजन कमी होऊ शकते.

लिंबू आणि पाणी

गरम पाण्यात लिंबू पिळून घ्या आणि सकाळी उठल्यानंतर चहा कॉफीऐवजी हे लिंबू पाणी प्या. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये मध सुद्धा टाकू शकता. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि चेहऱ्यावर ग्लो येतो.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)