ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आता डीटीएच कंपन्यांमध्येही स्पर्धा सुरू झाली असून कंपन्या निरनिराळे प्लान सादर करत आहेत. यामध्ये आता Tata Sky ने आपल्या सर्वात कमी किंमतीच्या प्लानमध्ये काही बदल केलेत. कंपनीच्या 153 रुपयांच्या प्लानमध्ये आता आधीपेक्षा जास्त चॅनल्स पाहता येणार आहेत.

153 रुपयांच्या टाटा स्कायच्या प्लानमध्ये आधी 150 चॅनल्स पाहता येत होते, पण आता या प्लानमध्ये 200 चॅनल्स पाहता येणार आहेत. नव्याने अॅड झालेले सर्व चॅनल्स SD रिझोल्युशन असलेले चॅनल्स आहेत. यामध्ये 29 DD चॅनल्स आणि 166 FTA (फ्री टू एअर) चॅनल्सचा समावेश आहे. याशिवाय कंपनीकडून या प्लानमध्ये 5 सर्व्हिस चॅनल्स देखील दिले जात आहे. यातील Tata Sky Darshan चॅनलवर तुम्ही काही प्रख्यात मंदिरांमधील टेलिकास्ट लाइव्ह पाहू शकतात.

काही दिवसांपूर्वीच Tata Sky ने ‘वॉच पोर्टल’ ही सेवा देखील सुरू केली आहे. यावर युजर्स लाइव्ह टीव्हीसह, सिनेमा आणि इतर कंटेंट देखील पाहू शकतात. तसंच, टाटा स्कायने व्हॉट्सअॅपद्वारे युजर्सना अकाउंट बॅलेन्स तपासण्यासह, इंस्टंट रिचार्ज, इमर्जंसी टॉप-अप, चॅनल पॅक डिटेल आणि रिचार्जनंतर अकाउंट रिफ्रेश कऱण्याचीही सुविधा आहे.