डॉ. नीता शाह, नेत्रततज्ज्ञ

अश्रू हे डोळ्यांसाठी काही प्रमाणात लाभदायी असतात, कारण डोळे ल्युब्रिकेटेड ठेवण्यासाठी आणि डोळ्यात गेलेले बाहेरील कण काढून टाकण्यासाठी ते उपयुक्त असतात. वैद्यकीय शास्त्रात रडण्याव्यतिरिक्त डोळय़ांतून अश्रू येण्याला ‘एपिफोरा’ असे म्हणतात. हे एका आजाराचे लक्षण आहे, ज्यात डोळ्यांत अपुऱ्या टिअर फिल्म ड्रेनेज तयार होतात. या परिस्थितीत अश्रू नॅसोलाक्रिमल सिस्टीमच्या माध्यमातून जाण्याऐवजी चेहऱ्यावर ओघळतात.

Breakfast Recipe
Breakfast Recipe : उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी बनवा मुगडाळीचा पौष्टिक नाश्ता, जाणून घ्या ही हटके रेसिपी
mini paneer sabudana vada recipe
Recipe : तेलात न तळता बनवा साबुदाण्याचे कुरकुरीत ‘प्रोटीनयुक्त’ मिनी वडे! बनवताना घाला फक्त ‘हा’ पदार्थ
Barfiwala bridge
मुंबई : बर्फीवाला पुलाचा ‘पार्किंग’साठी वापर, क्रिकेट खेळण्यासाठी, कपडे वाळत घालण्यासाठी उपयोग
World idli day 2024 how to make healthy oats idli
World idli day : पौष्टिक अन् झटपट नाश्त्यासाठी बनवा ‘ओट्स’ इडली; पाहा रेसिपी, प्रमाण

अश्रूंची प्रमाणापेक्षा अधिक निर्मिती आणि कोंडलेल्या वाहिन्या यामुळे डोळ्यांतून पाणी येते. बाळांमध्ये, कोंडलेल्या वाहिन्या हे सर्वसाधारण आढळणारे कारण आहे. काही बालकांमध्ये जन्मजात अविकसित वाहिन्या असतात, काही आठवडय़ांनी या पूर्ण विकसित झाल्यावर त्या रिकाम्या होतात. अश्रुवाहिनी निमुळती झाली असेल किंवा कोंडली असेल तर संसर्ग होण्याचा धोका असतो. परिणामी अश्रूंच्या पिशवीत अश्रू साचून राहू शकतात. प्रौढांमध्ये आणि मोठय़ा मुलांमध्ये अश्रूंची अतिनिर्मिती हे सामान्यपणे आढळणारे कारण असते.

डोळ्यांमध्ये कचरा गेल्यास..

बाहेरचे काही डोळ्यांत गेले तर सामान्य तापमान असलेल्या स्वच्छ पाण्याने डोळे धुवावे आणि रुग्णाने डोळे चोळू नये. हे केल्यानंतरही डोळ्यांत गेलेले बाहेरचे काही डोळ्यांतच असल्याची जाणीव कायम असेल तर रुग्णाने नेत्रविकारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

ल्युब्रिकेशनसाठी कृत्रिम अश्रू, अँटिबायोटिक ड्रॉप्स वापरून ते कण बाहेर काढावेत. रासायनिक घटकांमुळे इजा झाली असेल तर भरपूर स्वच्छ पाणी घेऊन डोळा धुवावा आणि रुग्णाने नेत्रविकारतज्ज्ञांची भेट ताबडतोब घ्यावी. निचरा मार्गाला झालेली इजा व अडथळा यामुळे डोळ्यांतून पाणी येण्याचे प्रमाण वाढू शकते ज्यासाठी उपचार करणे आवश्यक आहे.

डोळ्यांची काळजी

या आजारांमध्ये डोळ्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी रुग्णाने स्क्रीन टाइम कमी करणे आवश्यक आहे, अँटिरिफ्लेक्टिव्ह कॉटिंग असलेले चष्मे वापरावे, ब्ल्यू लाइट फिल्टर वापरला जाऊ  शकतो आणि २०-२०-२० या नियमाचा अवलंब करावा. या नियमांमध्ये वीस मिनिटे स्क्रीन वापरल्यानंतर वीस सेकंदांसाठी वीस फूट लांबपर्यंत दूर पाहावे. त्याचप्रमाणे उबदार कपडय़ाने डोळ्याला लावणेही हितकारक असेल. डोळ्यांमध्ये शुष्कपणा किती आहे यानुसार कृत्रिम अश्रू आणि जेल यांचा वापर केला जाऊ शकतो. शुष्कपणा गंभीर स्वरूपाचा असेल तर कोंडलेल्या ग्रंथी मोकळ्या करण्यासाठी आयआरपीएलचा (इंटेन्स रेग्युलेटेड पल्स लाइट थेरपी) वापर केला जाऊ शकतो.

डोळ्यांतून पाणी येण्याच्या संबंधित काही समस्या

  • अ‍ॅलर्जिक कंजंक्टिव्हायटिस- अ‍ॅलर्जिक कंजंक्टिव्हायटिस म्हणजेच डोळे येणे ही स्थिती एका अ‍ॅलर्जनमुळे उद्भवते जी शरीराच्या रोगप्रतिकारक यंत्रणेच्या प्रमाणापेक्षा अधिक दिल्या गेलेल्या प्रतिसादामुळे निर्माण होते. त्यामुळे डोळ्यांतून पाणी येणे, डोळ्यांत खाज येणे, डोळे लाल होणे आणि पाहताना त्रास होणे हे परिणाम होतात. रुग्णांनी अ‍ॅलर्जेन टाळावेत, डोळे चोळू नये आणि कॉन्टॅक्ट लेन्स वापरू नयेत. संसर्गजन्य कंजन्क्टिव्हायटिसमध्ये डोळे लाल होणे, वेदना होणे, प्रकाशाकडे बघण्यास त्रास होणे, चिकटपणा जाणवणे, चिकट द्रव बाहेर येणे ही लक्षणे दिसू शकतात. हा संसर्ग कोणत्याही उपचाराविना एका आठवडय़ात बरा होऊ शकतो.
  • डोळ्यांत शुष्कपणा येणे- डोळ्यात शुष्कपणा येण्यासाठी अनेक घटक कारणीभूत असू शकतात. यात शरीराकडून अश्रूंची पुरेशी निर्मिती न होणे,  अश्रू पटकन सुकणे, पाणी आणि म्यूकस यांचे योग्य संतुलन नसणे, वाहता वारा थेट डोळ्यात जाणे, वाढलेले वय आणि काही आजार (थायरॉईड आय आजार, गंभीर स्वरूपाचा सायनस, ऱ्हुमेटॉइड आर्थरायटिस, जॉग्रेन्स सिण्ड्रोम, एसएलई इत्यादी) यांचा समावेश आहे. या परिस्थितीमध्ये डोळे अधिक अश्रू निर्माण करून प्रतिसाद देतात.
  • डोळ्यात पाणी येण्यासाठी पापण्यांच्या समस्याही कारणीभूत असू शकतात. यात पापण्यांच्या कडेचा भाग वळणे किंवा पापण्यांच्या कडा बाहेरच्या बाजूस वळणे किंवा पापण्या अपुऱ्या बंद होणे इत्यादींचा समावेश आहे.
  • धूळ, रेती, कीटक, कॉन्टॅक्ट लेन्स यामुळे नेत्रपटलाला (कॉर्निया) चरा पडू शकतो. अशा परिस्थितीत संसर्ग वाढू नये यासाठी रुग्णाने नेत्रविकारतज्ज्ञांची ताबडतोब भेट घ्यावी.
  • पापण्यांच्या कडांजवळ असलेल्या ग्रंथी कोंडल्यास किंवा त्यांना संसर्ग झाल्यास ब्लेफरायटिस होऊ शकतो. अशा परिस्थितीत रुग्णांच्या डोळ्यातून पाणी येऊ  शकते, डोळे लाल होऊ शकतात, डोळ्यांमध्ये कंड येऊ शकते आणि पापण्यांच्या वर कोंडा जमा होऊ शकतो.
  • ब्लेफरायटिसशी संबंधित रांजणवाडी ही लाल रंगाची सुजलेली पुळी असते जी पापण्यांच्या कडेला तयार होते आणि बाहेरील पापण्यांच्या जवळ असते किंवा आत असते किंवा पापण्यांच्या खाली असते (अंतर्गत) आणि तैलग्रंथींना सूज आल्यामुळे किंवा संसर्ग झाल्यामुळे निर्माण होते.
  • नेत्रच्छदपुटिका ही संज्ञा अशा रांजणवाडीला दिली आहे, जी वेदना न देता गंभीर स्वरूप धारण करते. जर ती उबदार कॉम्प्रेसने बरी झाली नाही तर वैद्यकीय व्यवस्थापन शस्त्रक्रिया करता येऊ शकते, ज्यात एक लहानसा छेद देऊन आतील कण बाहेर काढले जातात.