आयुर्वेदिक आणि निसर्गोपचार औषधांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्यामुळे तुळस वनस्पतीचे औषधी वनस्पतींमध्ये अग्रगण्य स्थान आहे. तुळस वनस्पतीचे फक्त पानेच गुणकारी नसून या वनस्पतीची फुलेही तितकीच बहुगुणी आहेत. पुढील दहा आरोग्य समस्यांवर मात करण्यासाठी तुळस वनस्पती हे उत्तम औषध ठरते..
१. ताप- तुळशीच्या पानांचा रस तापाचे प्रमाण कमी करण्यास मदतगार ठरतो.
२. सर्दी- रिकाम्या पोटी तुळशीची पाने चघळल्याने सर्दी दूर होऊ शकते.
३. घसा खवखवणे- गरम पाण्यात तुळशीची पाने टाकून गुळणी करावी. दमा आणि ब्राँकायटिस असणाऱयांनाही हे लाभदायक ठरते.
४. डोकेदुखी- अतिउष्णतेने डोकेदुखीची समस्या निर्माण होणे ही सामान्य गोष्ट आहे. अशावेळी तुळशीची पाने आणि चंदनाची पेस्ट करून कपाळावर लावावी. यामुळे नक्कीच डोकेदुखी कमी होण्यास मदत होते.
५. डोळ्यांची समस्या- डोळ्यांच्या समस्यांवर तुळशीच्या काळ्या पानांचा रस महत्त्वाची भूमिका निभावतो. तुळशीच्या काळ्या पानांच्या (कृष्ण तुळस) रसाचे काही थेंब डोळ्यात टाकल्याने दाहकात कमी होण्यास मदत होते.
६. दातांची समस्या- तुळशीच्या पानांची पावडर मोहरीच्या तेलात मिसळून पेस्ट तयार करून या पेस्टने दात घासावेत. यामुळे हिरड्या, दात दुखणे यावर तात्काळ उपचार होतो.
७. त्वचेच्या समस्या- त्वचेच्या समस्यांवरही तुळशीच्या पानांचा रस गुणाकारी आहे.
८. कीटक चावणे- डास आणि इतर कीटकांचे चावणे मुख्यत: मान्सूनच्या महिन्यात अशा समस्या वाढतात. अशावेळी ज्या ठिकाणी किटक चावला आहे तेथे तुळशीच्या मुळांची पेस्ट लावावी.  
९. किडनी स्टोन- किडनी स्टोनच्या समस्येला सामोरे जाणाऱयांनी मध आणि तुळशीच्या पानांच्या रस मिश्रित मिश्रण प्यावे.
१०. मानसिक तणाव- रोजच्या धाकाधकीच्या जीवनात मानसिक तणाव निर्माण होणे हेही रोजचे झाले आहे. तणाव विरहीत जीवन जगण्यासाठी रोज १० ते १२ तुळशी पाने रोज खावीत. तुळशीची पाने तणावावर मात करणारे शस्त्र म्हणून काम करतात.