देशातील आघाडीची वाहन निर्माता हिरो मोटोकॉर्पने भारतीय बाजारपेठेत आपल्या उत्पादनांच्या किंमती बदलल्याची घोषणा केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीने आपला संपूर्ण पोर्टफोलिओ स्प्लेंडर कम्युटरसह महाग केला आहे, जे भारतीय बाजारात सर्वाधिक विक्री होणारे मॉडेल आहे. किंमती वाढवण्याव्यतिरिक्त मोटारसायकलमध्ये इतर कोणतेही बदल केले गेले नाहीत.

किंमत किती वाढली?

नवीन किंमती २० सप्टेंबरपासून लागू झाल्या आहेत. वाढीव किंमतीनंतर, स्प्लेंडर आईस्मार्ट ड्रम / अलॉयची किंमत ६९,६५० रुपये, स्प्लेंडर आईस्मार्ट डिस्क / अलॉय ७२३५० रुपये, स्प्लेंडर प्लस किक / ड्रम / अलॉयची किंमत ६४,८५० रुपये निश्चित करण्यात आली आहे. स्प्लेंडर प्लस १०० मिलियन एडीशन किंमत ७०,७१० रुपये असेल. स्प्लेंडर प्लस ब्लॅक आणि एक्सेंट सेल्फ / ड्रम / अलॉयची किंमत ६८,८६० रुपये, सुपर स्प्लेंडर ड्रम / अलॉयची किंमत ७३,९०० रुपये आणि सुपर स्प्लेंडर डिस्क / अलॉयची किंमत ७७,६०० रुपये असेल.

चमकदार त्वचेसाठी बनवा उडीद डाळीचा फेसपॅक; त्वचेच्या अनेक समस्यांपासून मिळेल सुटका!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येथे हे लक्षात घेण्यासारखे आहे की हिरो स्प्लेंडर ही कमी बजेटमध्ये येणारी स्टाईलिश बाईक आहे, मायलेज संदर्भात, कंपनीने दावा केला आहे की ही बाईक एका लिटर पेट्रोलमध्ये ८०.६ kmpl चे मायलेज देते. जी आता देशात सर्वाधिक आहे. ऑगस्ट २०२० मध्ये कंपनीने या बाईकच्या १,७७,८११ युनिट्सची विक्री केली, जी २०२१ मध्ये २३ टक्क्यांनी वाढून २,१८,५१६ युनिट्स झाली आहे.