ऋतु बदलले की त्वचेसंबंधीत अनेक आजार, समस्या डोकं वर काढतात. त्यातच हिवाळ्यामध्ये त्वचेतील आर्द्रता कमी होते. परिणामी अनेक वेळा त्वचा कोरडी पडून सतत शरीरावर खाज येते. त्यातच जर अतिप्रमाणात खाजवल्यामुळे त्वचेला हानी पोहोचून संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळेच या त्रासापासून सुटका करुन घ्यायची असेल तर काही नैसर्गिक आणि घरगुती उपाय फायदेशीर ठरतात. चला तर मग पाहुयात सतत सुटणाऱ्या खाजेवर काही घरगुती उपाय –

१. खोबरेल तेल-
अनेक वेळा त्वचा कोरडी पडल्यामुळे किंवा एखाद्या किटकाने दंश केल्यामुळे शरीरावर खास सुटते. एकाच जागी सतत खाजवल्यामुळे शरीराच्या त्या भागावर लाल रंगाचे चट्टे येतात. अशावेळी खाज येत असलेल्या भागावर खोबरेल तेल लावावं. तेलामुळे शरीरावरील खाज कमी होते.

२. तुळस –
तुळस ही बहुगुणी वनस्पती असून तुळशीचे अनेक फायदे आहेत. अगदी त्वचेचं सौंदर्य जपण्यापासून ते आजारावर तोडगा काढण्यापर्यंत तुळशीचा विविधांगी उपयोग करता येतो. त्यामुळे त्वचेवर खाज सुटल्यानंतर त्या भागावर तुळशीची काही पाने चोळा किंवा या पानांचा काढा काढून तो काढा खाज येत असलेल्या भागावर लावा.

३. ओटमील –
नाश्त्यामधील एक प्रकार म्हणजे ओट्स. या ओट्समध्ये अनेक गुणधर्म असून ओटमीलपासून तयार केलेली पावडरही तितकीच उपयुक्त आहे. या पावडरमध्ये अँटीइन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीजचे प्रमाण असते. त्यामुळे खाज सुटलेल्या भागावर ही पावडर लावल्याने खाज कमी होऊन पुरळ आले असल्यास ते कमी होते. त्यासाठी एक कप पावडरमध्ये थोडंसं पाणी मिसळून याची घट्ट पेस्ट तयार करावी. ही पेस्ट खाज सुटलेल्या भागावर लावून थोड्यावेळाने कोमट पाण्याने हा लेप काढावा.

आणखी वाचा- शौचालयात फोन वापरू नका, अन्यथा होईल ‘हा’ गंभीर आजार

४. कोरफड –
शरीरावर खाज येत असल्याच त्या भागावर कोरफडीचा गर लावावा. हा गर लावल्यानंतर काही काळ तसाच ठेवावा. त्यानंतर गार पाण्याने तो भाग स्वच्छ पुसून घ्यावा. त्यामुळे खाज आलेल्या जागेवर कोणत्याही प्रकारचे लाल पट्टे येत नाहीत.

५. पेट्रोलियम जेली –
पेट्रोलियम जेलीचे कोणतेही दुष्परिणाम होत नसल्यामुळे खाज येत असलेल्या जागेवर ती लावू शकता. ही जेली लावल्यामुळे शरीरावरी खाज कमी होते. त्यामुळे त्वचेचे नुकसान होण्यापासून तुमचा बचाव होतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.