रेडमी नोट ११ सीरीज लाँच करण्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. कंपनीकडून २८ ऑक्टोबरला एका इव्हेंट दरम्यान हे फोन लाँच केले जाईल. ही सिरिज रेडमी नोट ११, रेडमी नोट ११ प्रो आणि रेडमी नोट ११ प्रो प्लस या तीन व्हेरिएंटमध्ये लॉंच केले जाणार आहे. तसेच या फोनचे स्ट्रीमिंग JD.com वर करण्यात येणार आहे. दरम्यान लेटेस्ट आयफोन १३ प्रमाणे या फोनची रचना करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

शाओमीने रेडमी नोट ११ सीरीजची Weibo वर लाँच करण्याची घोषणा केलीय. रेडमी नोट ११ मध्ये मध्यभागी कटआउटसह होल-पंच डिस्प्ले देण्यात आला आहे. JBL- ट्यून केलेले स्पीकर ग्रिल, ३.५mm ऑडीओ जॅक आणि माइक होल हे फोनच्या वरच्या बाजूस लावण्यात आलेले आहे. कॅमेरा डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर, आयताकृती आकाराचा क्वाड कॅमेरा सेटअप आहे, ज्याच्या वरच्या बाजूला एक मोठा सेन्सर देण्यात आला आहे. तसेच कॅमेरा मॉड्यूलमध्ये एलईडी फ्लॅश देखील आहे. रेडमी नोट ११ या स्मार्टफोनच्या उजव्या बाजूस वॉल्यूम रॉकर आणि पॉवर बटण दिले गेले आहे.

रेडमी नोट ११ सिरिज कलर पर्याय

दरम्यान कंपनीकडून रेडमी नोट ११, रेडमी नोट ११ प्रो आणि रेडमी नोट ११ प्रो+ बद्दल माहिती देण्यात आली आहे की, सर्वात प्रीमियम असलेला रेडमी नोट ११ प्रो + मिस्टीरियस ब्लॅकलँड, मिस्टी फॉरेस्ट आणि टाइम क्विट पर्पल कलर या पर्यायांमध्ये ग्राहकांना घेता येणार आहे. दुसरीकडे, रेडमी नोट ११ प्रो मॉडेल मिस्टीरियस ब्लॅकलँड, मिस्टी फॉरेस्ट, शैलो मेंग सिंगे आणि टाइम क्विट पर्पल कलर या रंगांमध्ये येईल. हे दोन्ही स्मार्टफोन ६जिबी + १२८जिबी, ८जिबी + १२८जिबी आणि ८ जिबी + २५६जिबी या स्टोरेज मॉडेलमध्ये आणले जाणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रेडमी नोट ११ सिरिज संभाव्य किंमत

लॉन्चच्या आधी, JD.com वर शाओमी रेडमी नोट ११ सिरिजसाठी प्री-बुकिंगची सुरूवात करण्यात आली आहे. तसेच तुम्ही हा फोन १,२०० ते २,४०० रुपयांनी प्री बूक करू शकता आणि लॉंच झाल्यावर पहिली खरेदी करू शकतात. रेडमी नोट ११ प्रो हा MediaTek Dimensity 920 SoC सह येणार आहे. रेडमी नोट ११ प्रो १०८-मेगापिक्सलचा मेन कॅमेरा आणि रेडमी नोट ११ ५०-मेगापिक्सेलचा मेन कॅमेरा दिला जाऊ शकतो. रेडमी नोट ११ ची किंमत अंदाजे १४,०५० रुपये या किंमतीपासून सुरू होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे, रेडमी नोट ११ प्रो ची किंमत अंदाजे १८,७०० रुपये या किंमतीपासून सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.