टाटा मोटर्स या स्वदेशी ऑटोमोबाईल कंपनीने आपल्या बहुप्रतिक्षित मायक्रो एसयूव्ही टाटा पंचचे आज १८ ऑक्टोबर लॉंच केली. जर तुम्ही सुद्धा टाटा पंच खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला टाटा मोटर्सच्या या छोट्या एसयूव्हीची वैशिष्ट्ये, बुकिंग आणि डिलिव्हरी तपशील तसेच किंमतीबद्दल सांगणार आहोत.
दिवाळीपूर्वी वितरण होऊ शकते सुरू

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिवाळीपूर्वी टाटा मोटर्सने आपली सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही टाटा ‘पंच’ लाँच केली. कंपनीने टाटा पंचची सुरुवातीची किंमत ५.४९ लाख रुपये ठेवली आहे. कंपनीने ४ ऑक्टोबर रोजी अधिकृत बुकिंग सुरु केले होते. ग्लोबल एनसीएपी क्रॅश टेस्टमध्ये या कारला प्रौढ सुरक्षेच्या दृष्टीने पंचतारांकित रेटिंगही मिळाली आहे. सणासुदीच्या काळात कार खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांना आता बाजारात दुसरा पर्याय मिळेल.कंपनीने दावा केला आहे की ती मॅन्युअल ट्रान्समिशनवर १८.९७ kmpl आणि AMT वर १८.८२ kmpl चे मायलेज देईल.

(हे ही वाचा: Tata Punch पासून Mahindra Thar पर्यंत…’या’ आहेत भारतातील टॉप १० सुरक्षित कार)

शक्तिशाली इंजिन

टाटा पंच कंपनीच्या ALFA (Agile Light Flexible Advanced) प्लॅटफॉर्मवर विकसित करण्यात आले आहे. त्याच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाले तर यात १.२ लीटर ३ सिलेंडर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे, जे ८५ bhp पॉवर आणि ११३ Nm टॉर्क जनरेट करते. हे ५ स्पीड मॅन्युअल आणि एएमटी ट्रान्समिशन पर्यायांसह दिले जाते. टाटा पंचला इको आणि सिटी सारखे २ ड्रायव्हिंग मोड देखील मिळतात. त्याच वेळी, सुरक्षेच्या बाबतीत, त्याला ग्लोबल एनसीएपी कार क्रॅश सेफ्टी टेस्टमध्ये ५ स्टार रेटिंग मिळाले आहे.

( हे ही वाचा: फक्त आठ हजार भरून विकत घ्या TVS Star City Plus; जाणून घ्या ‘या’ खास योजनेबद्दल)

जबरदस्त लुक आणि फीचर्स

टाटा पंचचे बाह्य आणि आतील भागही नेत्रदीपक आहेत. त्याचा मागील आणि पुढचा लुक बर्‍यापैकी मस्कुलर आहे, म्हणून तो आकाराने लहान असला तरी तो खूप शक्तिशाली दिसतो. फीचर्सविषयी बोलायचे झाले तर, टाटा पंचमध्ये ७-इंच हर्मन इन्फोटेनमेंट सिस्टम, ७-इंच TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, iRA कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, ९० डिग्री उघडणारे दरवाजे, ऑटो हेडलॅम्प, रेन सेन्सिंग वायपर, क्रूज कंट्रोल, १६-इंच डायमंड कट अॅलॉय व्हील आहेत. विशेष फीचर्स आहेत, जी लोकांना खूप आवडतील.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The wait is over tatas punch launched in india know the price ttg
First published on: 18-10-2021 at 14:07 IST