Tup chapati benefits: हल्लीच्या काळातील लहान मुलांना नाश्त्यामध्ये विविध पदार्थ दिले जातात. पण, पूर्वीच्या काळी आजी लहान मुलांना पोळीला तूप लावून आणि त्यात साखर घालून खायला द्यायची. आता कालांतराने तूप, साखर, पोळी खाणाऱ्यांची संख्या कमी होत चालली आहे. पण, तुम्हाला ठाऊक आहे का? तूप आणि साखर, पोळी खाण्याचे अनेक फायदे आहेत.

तूप आणि साखर घालून पोळी खाल्ल्यास काय होते?

एक चमचा तूप असलेल्या एका पोळीमध्ये २५६ कॅलरीज असतात. या कॅलरीजपैकी ६१ टक्के चरबी, ३३ टक्के कर्बोदके आणि ४.२ ग्रॅम फायबर आणि सहा टक्के प्रथिने आहेत. यात अर्धा चमचा साखर घातली की सुमारे १८ कॅलरीज मिळतात. हे लहान मुलांव्यतिरिक्त मोठ्यांच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे.

एक पोळी संपूर्ण आहार

एक पोळी, तूप आणि साखर खाल्ल्यास पोळी पूर्ण आहार म्हणून काम करते, यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. तुम्ही सकाळी नाश्त्यात किंवा संध्याकाळी ते खाल्ले तरी तुम्हाला जास्त वेळ भूक लागत नाही आणि शरीरात ऊर्जाही असते. तसेच ज्यांना गोड जास्त खाण्याची सवय आहे त्यांच्यासाठी पोळी, तूप आणि साखरेचे सेवन करणे फायदेशीर आहे. तूप आणि पोळी एकत्र खाल्ल्याने लालसा कमी होते. ते खाल्ले की पोट भरते. अशाप्रकारे हे वजन संतुलित करण्यासदेखील उपयुक्त आहे.

हेही वाचा: फ्रिजशिवाय हिरवी मिरची दीर्घकाळ कशी साठवायची? फॉलो करा ‘या’ तीन सोप्या टिप्स…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तूप, साखर, पोळी कधी खाल्ली जाते?

अनेक जण गरमागरम पोळीवर तूप पसरवतात आणि त्यावर साखर टाकतात आणि पोळीचा रोल करून खातात, तर काही जण तूपामध्ये साखर टाकून पोळीबरोबर खातात. तसेच हा नाश्ता सकाळी ८ ते १० या वेळेत करावा.