Why Bride Apply Mehandi : सध्या देशात लग्नाचे वारे वाहत आहेत. हिंदू पद्धतीतील लग्न असो किंवा मुस्लीम पद्धतीतील, कोणत्याही लग्नात वधूला मेहंदी लावली जाते. आपल्याकडे प्रत्येक शुभ प्रसंगी मेहंदी लावण्याची पद्धत आहे. हिंदू धर्मात तर मेहंदीला सोळा श्रुंगारांपैकी एक म्हटले आहे. तुम्हाला माहित आहे का की लग्नाआधी वधू-वराच्या हातावर मेहंदी लावण्यामागे एक वैज्ञानिक कारण आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खरंतर, लग्नाच्या वेळी वधू-वराच्या मनामध्ये भीती आणि अस्वस्थता असते. हात आणि पायांवर मेंदी लावल्यास शरीराचे तापमान कमी होते. त्यामुळे वधू-वराची अस्वस्थताही कमी होते. या कारणास्तव, वधू आणि वराच्या हातावर आणि पायावर मेहंदी लावली जाते.

Chanakya Niti : प्रेम संबंधांमध्ये ‘या’ तीन गोष्टींची अवश्य घ्या काळजी; अन्यथा नात्यामध्ये येऊ शकतो दुरावा

तसेच, मेहंदीला प्रेमाचे प्रतीक मानले जाते. असे म्हणतात, वधू-वराच्या हातावरील मेहंदीचा रंग जितका गडद असेल, त्यांच्यात तितकेच प्रेम असते. मेहंदीचा रंग जोपर्यंत टिकतो तोपर्यंत हे जोडप्यासाठी भाग्यवान मानले जाते. मेहंदी वधूच्या सौंदर्यातही भर घालते, त्यासोबतच ती अतिशय पवित्र मानली जाते.

प्रत्येक धर्मात मेहंदीला शुभ मानले गेले आहे. याचा वापर केवळ भारतातच नाही तर पाकिस्तान आणि बांगलादेशातही केला जातो. मेहंदी केवळ हातातच नाही तर केसांनाही लावली जाते. याशिवाय नैसर्गिक रंगासाठीही मेहंदी वापरली जाते. मुस्लिम धर्माचे लोकही दाढीला मेहंदी लावतात. असे मानले जाते की प्रेषित मुहम्मद यांनी आपल्या दाढीमध्ये मेहंदी लावली होती.

(येथे दिलेली माहिती सामान्य माहिती आणि गृहीतकांवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: There is a scientific reason behind the bride wearing mehndi at a wedding pvp
First published on: 19-02-2022 at 17:49 IST