Dinner Mistakes: वजन कमी करणे आणि वजन निंयत्रणात ठेवणे दोन्ही गोष्टी अवघड आहे. कित्येकदा आपण लठ्ठ नसतो तरीही स्वत:ला असे वाटते की आपले वजन वाढते आहे. याचे कारण तुमच्या छोट्या छोट्या चुका असू शकतात ज्यामुळे तुमेच शरीर तंदरुस्थ राहत नाही. जेवणानंतर नकळतपणे होणाऱ्या चुकांबाबत येथे माहिती दिली आहे ज्यामुळे वजन कमी करण्यास अडथळे येतात आणि ज्यामुळे शरीराचे वजन सतत वाढते. जर तुम्हीही या चुका करत असाल तर वेळीच त्या सुधारा.

रात्रीच्या जेवणानंतर करू नयेत या गोष्टी

स्नॅक्स किंवा काहीतरी गोड खाणे
जेवल्यानंतर बर्‍याच वेळा तुम्हाला स्नॅक्स किंवा काहीतरी गोड खावेसे वाटते, परंतु रात्री उशिरा या स्नॅकिंगमुळे वजन वाढू शकते. त्याचबरोबर जेवणानंतर गोड खाल्ल्यास त्याचा थेट परिणाम तुमच्या वजनावर होतो.

हेही वाचा – फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी सीताफळ खाण्याचे आहेत आश्चर्यकारक फायदे, डॉक्टरांकडून जाणून घ्या…

खाल्ल्यानंतर लगेच झोपणे
झोपण्याच्या किमान एक ते दोन तास आधी अन्न खाणे चांगले असते. जेवल्यानंतर लगेच झोपल्यास अन्नाचे पचन व्यवस्थित होत नाही. यामुळे पचनाच्या समस्या, बद्धकोष्ठता, सूज येणे यासह वजन देखील वाढू शकते.

जेवल्यानंतर लगेच शारीरीक हालचाल करणे
रात्रीच्या जेवणानंतर लगेचच नाचणे टाळले पाहिजेत. जर तुम्ही अचानक शारीरिक हालचाली करत असाल तर तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते. त्यामुळे पोटदुखी होते आणि अपचनही होते. असे केल्याने शरीराला अन्नातून पोषक तत्व मिळत नाहीत आणि जास्त कॅलरीजमुळे वजनावर परिणाम करतात.

हेही वाचा – सकाळी उठल्यानंतर करू नयेत ‘या’ गोष्टी; शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

रात्रीचे जेवण योग्य वेळी न करणे
असे म्हणतात की, शरीराचे स्वतःचे बायोलॉजिकल घड्याळ असते ज्यानुसार शरीर कार्य करते. रात्रीचे जेवण रात्री ८-९ वाजता घेणे उत्तम मानले जाते. पण, रात्री १०-११ वाजेपर्यंत अनेकजण जेवण करतात. असे केल्याने वजन वाढते.