Breakup Signs : बॉयफ्रेंड वा गर्लफ्रेंड असो किंवा नवरा-बायकोचं नातं असो; जर नात्यात एकमेकांविषयी प्रेम, काळजी, जिव्हाळा, समजूतदारपणा दिसत नसेल, तर नातं लवकर तुटू शकतं. कोणतंही नातं सुरुवातीला खूप गोड वाटतं; पण जसजसा काळ आणि वेळ जातो, तसा जोडीदाराचा खरा स्वभाव समजतो आणि नात्यात अनेक गोष्टींवरून मतभेद होऊ शकतात. ही लक्षणं वेळीच ओळखणं गरजेचं आहे; नाही तर नातं फार काळ टिकू शकत नाही.

वारंवार विश्वासघात करणे

जर तुमचा जोडीदार वारंवार तुमचा विश्वासघात करीत असेल, तर वेळीच सावध व्हा! कारण- असं नातं फाळ काळ टिकू शकत नाही.

diy health benefits of onions what happens your body if yo do not eat onions for a month
आहारात महिनाभर कांद्याचे सेवन न केल्यास शरीरात काय बदल होतील? तज्ज्ञ म्हणाले…
hormonal imbalance in marathi
Health Special: संप्रेरकांचे असंतुलन (हार्मोनल इम्बॅलन्स) म्हणजे काय? त्यावर उपाय काय?
consuming your meals on selected time or when you hungry which method is beneficial for you read expert advice
भूक लागली तरीही तुम्ही ठरलेल्या वेळेतच जेवता का? जेवणाची योग्य वेळ कशी ठरवायची? पाहा तज्ज्ञ काय म्हणतात…
sleep apnea in marathi, what is sleep apnea in marathi
Health Special: स्लीप अ‍ॅप्नीया – झोपेत असा श्वास अचानक का थांबतो? किती गंभीर आहे ही समस्या?

हेही वाचा : Spinach : तुम्ही हिरवा पालक खाता की लाल? जाणून घ्या कोणती पालक भाजी सर्वांत जास्त फायदेशीर?

संवादाची कमतरता

कोणत्याही नात्यामध्ये संवाद हा खूप महत्त्वाचा घटक आहे. जर दोन व्यक्तींमध्ये संवाद नसेल, तर नात्यामध्ये अनेक गैरसमज निर्माण होऊ शकतात; ज्यामुळे नातं तुटण्याची शक्यता आणखी वाढते.

वारंवार भांडणं होणे

नवरा-बायको किंवा गर्लफ्रेंड वा बॉयफ्रेंडच्या नात्यामध्ये छोटी-मोठी भांडणं होत असतात. पण, जर नात्यामध्ये संवाद कमी आणि भांडणं जास्त होत असतील, तर ही चिंतेची बाब आहे.

भावनिकदृष्ट्या कनेक्ट नसणे

ज्या नात्यामध्ये एकमेकांविषयी भावना उरत नाहीत, ते नातं फार काळ टिकू शकत नाही. एकमेकांच्या भावना समजून घेणं, एकमेकांविषयी काळजी, प्रेम, जिव्हाळा नसेल, तर नातं तुटण्याच्या मार्गावर असू शकतं.

हेही वाचा : Relationship Tips : जोडीदारबरोबर असतानाही एकटेपणा जाणवतो, ‘ही’ असू शकतात कारणे

शारीरिक हिंसाचार आणि मानसिक अत्याचार

जर तुमचा जोडीदार तुमच्यावर शारीरिक हिंसाचार किंवा मानसिक अत्याचार करीत असेल, तर अशा जोडीदाराबरोबर राहणं चुकीचं आहे. या नात्यातून लवकरात लवकर बाहेर पडा.

एकमेकांविषयी आदर नसणे

कोणतंही नातं फक्त प्रेमावर टिकत नाही. नात्यात एकमेकांविषयी आदर-सन्मान असणं तितकंच गरजेचं आहे. जर जोडीदार तुमचा वारंवार अपमान करीत असेल, तुम्हाला तुच्छतेची वागणूक मिळत असेल, तर अशा नात्यातून बाहेर पडणं गरजेचं आहे.

नाते सुधारण्याचा प्रयत्न न करणे

जर नात्यामध्ये गैरसमज होत असतील आणि नातं तुटण्याच्या मार्गावर असेल तरीसुद्धा तुम्ही किंवा तुमचा जोडीदार नातं सुधारण्याचा प्रयत्न करीत नसाल, तर समजावं की हे नातं फार काळ टिकू शकत नाही.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)