Thick Blood Disease Signs: आरोग्याच्या दृष्टीने हलगर्जीपणा, विशेषतः चुकीची जीवनशैली शरीरात अनेक विकारांना आमंत्रण देते. त्यातला सर्वात धोकादायक आणि लोकांना कमी माहीत असलेला विकार म्हणजे रक्त घट्ट होणे, म्हणजेच रक्ताचा चिकटपणा वाढणे. वैद्यकशास्त्रात याला हायपरकोअग्युलेबिलिटी असा गंभीर शब्दप्रयोग केला जातो. मात्र, या अवस्थेची वेळेत ओळख झाली नाही तर हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि रक्तसंचरणाशी संबंधित अनेक धोकादायक गुंतागुंतींचा धोका दुपटीने वाढतो.
रक्त घट्ट झालं तर नक्की होतं काय?
तज्ज्ञ सांगतात की, जेव्हा शरीरातील रक्त साधारण घनतेपेक्षा अधिक जाड, चिकट आणि प्रवाहात मंद होतं, तेव्हा एक अत्यंत धोकादायक स्थिती निर्माण होते. रक्ताचा थक्का (Blood clot) तयार होण्याचा धोका अनेक पटींनी वाढतो. हा थक्का हृदयापर्यंत पोहोचला तर हार्ट अटॅक, तर मेंदूपर्यंत पोहोचला तर स्ट्रोक यांसारखे प्राणघातक प्रसंग घडू शकतात.
फक्त एवढंच नाही, रक्त घट्ट झाल्याने शरीरात ऑक्सिजन, हार्मोन्स आणि पोषक घटकांचा प्रवाहही मंदावतो. परिणामी शरीरातील ऊतींना आवश्यक ते पोषण मिळत नाही आणि आरोग्य दिवसेंदिवस ढासळू लागतं.
रक्त घट्ट होण्याची कारणं, तज्ज्ञांचा इशारा
कार्डिओलॉजिस्ट डॉ. सुमन भंडारी यांच्या मते, अत्याधिक घाम आल्याने शरीरातील द्रव कमी होते आणि रक्ताची कंसिस्टन्सी वाढते.
- रक्तातील कोलेस्ट्रॉल व चरबी वाढल्याने रक्त घट्ट होण्याची शक्यता वाढते.
- पॉलिसायथेमिया व्हेरासारख्या आजारात लाल रक्तपेशींची संख्या धोकादायकरीत्या वाढते, ज्यामुळे रक्त घट्ट होतं.
- शरीरात प्रोटीन C आणि प्रोटीन S यांची कमतरता असेल तर रक्त गुठळ्या (Clots) सहज तयार होऊ शकतात.
ही कारणं दिसायला सामान्य वाटतात, पण त्यांचे परिणाम मात्र अत्यंत गंभीर असू शकतात.
रक्त घट्ट झाल्याची लक्षणं ओळखा नाहीतर उशीर होईल
बहुतांश लोकांना सुरुवातीच्या टप्प्यात कोणतंही लक्षण जाणवत नाही. पण, रक्तात थक्का तयार होऊ लागताच शरीर इशारे देतं
- वारंवार डोकेदुखी, डोक्यात जडपणा
- श्वास घेण्यात त्रास, धाप लागणे
- डोळ्यांत वेदना, दृष्टी धूसर होणे
- शरीरावर अत्याधिक खाज, त्वचेत अस्वस्थता
- हाता-पायात कळा, ताण, वेदना
- शरीर सुजणे किंवा अचानक दुखणे
ही लक्षणं दुर्लक्षित केली तर पुढे गंभीर परिस्थिती उद्भवू शकते.
घट्ट रक्तामुळे होणारे धोके
– रक्त घट्ट झाल्यास
- हार्ट अटॅकचा धोका वाढतो
- मेंदूतील रक्तप्रवाह अडथळल्याने स्ट्रोक येऊ शकतो
- हृदय कमजोर होऊ शकतं
- किडनी फेल्युअर होण्याचा धोका
- रक्तसंचरणातील मोठ्या अडचणी
ही स्थिती वेळेत थांबवली नाही तर परिणाम प्राणघातक ठरू शकतात.
रक्त पातळ करण्याचे उपाय
- दररोज नियमित व्यायाम
- दिवसभर पुरेसं पाणी पिणं
- दालचिनी, द्राक्षे यांचे सेवन
- तेलकट अन्न, धूम्रपान, जास्त मीठ टाळणे
- वेळोवेळी डॉक्टरांकडून तपासणी
शरीरात रक्त घट्ट होत असल्याची चिन्हे दिसताच त्वरित वैद्यकीय सल्ला घेतल्यास मोठा धोका टाळता येऊ शकतो.
