निरोगी शरीरासाठी पोषक आहार महत्वाचा आहे. त्यामुळे, जेवणात भरपूर पोषक तत्व असलेल्या पदार्थांचा समावेश करावा. त्यांच्या सेवनाने शरीराला आवश्यक प्रमाणात जीवनसत्वे, प्रथिने मिळतील. तसेच जेवन वेळेत करणे देखील गरजेचे आहे. उशिरा केल्यास पचनसंबंधी समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच जेवल्यानंतर काही गोष्टी टाळल्या पाहिजेत, असे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे. त्याने शरिराला नुकसान होऊ शकते.

या गोष्टी टाळा

१) व्यायाम करणे टाळा

जेवल्यानंतर व्यायाम करू नये, याने पचनक्रिया बिघडू शकते. जेवल्यानंतर व्यायाम केल्यास उल्टी, पोटदुखीची समस्या होऊ शकते. त्यामुळे, जेवल्यानंतर व्यायाम करणे टाळा. सकाळी उठून व्यायाम केल्याने वजन कमी होण्यास मदत होईल.

२) जेवल्यानंतर झोपू नका

जेवन केल्यानंतर झोपणे टाळले पाहिजे. असे केल्यास पचनक्रियेवर परिणाम होऊ शकते आणि पोटात जळजळ वाटू शकते. शरिरासाठी झोप आवश्यक आहे. रोज झोप घेतली पाहिजे. पण रात्री जेवल्यानंतर लगेच झोपू नये.

३) पुढे झुकू नये

जेवल्यानंतर पुढे झुकावे लागेल असे कुठलेही काम करू नका. असे केल्यास पचनक्रियेमध्ये काम करणारे अ‍ॅसिड शरीराला नुकसान पोहोचवू शकते. अन्न पचवण्यात पचनसंस्था मदत करते, तिला हानी पोहोचेल असे काम करू नका.

४) फळ खाऊ नये

जेवल्यानंतर फळ खाऊ नये. असे केल्यास शरीरासाठी आवश्यक असलेल्या पोषक तत्त्वांचे शोषण फार कमी प्रमाणात होऊ शकते. याने शरीराला अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

५) पाणी पिने टाळा

जेवताना पाणी कमी प्या. पाणी पचनक्रिया कमजोर करते. पाणी प्यायल्याने अ‍ॅसिड पातळ होते आणि पचन क्रिया बिघडते. त्यामुळे जेवताना पाणी कमी प्या आणि गटागटा पिऊ नका.

६) मद्य पिऊ नये

जेवल्यानंतर मद्यपान आणि धुम्रपान करू नये. याने शरीराला नुकसान होऊ शकते. मद्यपान शरीरासाठी हानीकारक आहे. त्याच्या सेवनाने स्वादुपिंडावर परिणाम होऊ शकतो.

७) चहा कॉफी पिऊ नये

चहा किंवा कॉफीमध्ये फेनोलिक संयुग आढळते. हे संयुग शरिरासाठी आवश्यक पौष्टिक आहारातील लोह आणि इतर पोषक तत्त्वांचे शोषण करताना अडथळा ठरते. त्यामुळे, जेवल्यानंतर चहा कॉफीचे सेवन टाळा.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)