How to get rid of red ants: स्वयंपाकघरात अनेकदा लाल, काळ्या मुंग्या दिसतात. घरातील गुळ- साखरेच्या डब्याला, किचनमधील सिंकच्या आजूबाजूला, ओट्यावर या मुंग्यांची रांग लागलेली दिसते. अनेक उपाय करूनही या मुंग्या कमी होत नाहीत. अशा परिस्थितीत जर तुम्हालाही या समस्येचा त्रास होत असेल, तर आम्ही तुमच्यासाठी मुंग्यांपासून सुटका मिळवण्याचा एक अतिशय सोपा मार्ग घेऊन आलो आहोत. या पद्धतीद्वारे तुम्ही मुंग्या होण्यापासून अटकाव करू शकता.

‘या’ गोष्टींचा करा वापर

  • पाच कापराचे तुकडे
  • अर्धा लिटर गरम पाणी
  • २ चमचे व्हिनेगर
  • एक चमचा डेटॉल
  • दोन चमचे बोरिक अॅसिड

लाल मुंग्या दूर करण्याचा सोपा मार्ग

मुंग्यांपासून सुटका करण्यासाठी तुम्हाला एक मिश्रण तयार करावे लागेल. त्यासाठी सर्वप्रथम पाच कापराचे तुकडे घ्या आणि ते बारीक करा. गरम पाण्यात ते चांगले मिसळा. नंतर त्यात व व्हिनेगर, बोरिक अॅसिड आणि डेटॉल या सर्व गोष्टी व्यवस्थित मिक्स करून बाटलीत भरा.
आता लाल मुंग्यांपासून सुटका मिळवण्यासाठी मुंग्या दिसतील तिथे हा स्प्रे शिंपडा, यामुळे काही वेळात मुंग्या गायब होतील.