How to Get Rid of Yellow Teeth: दात केवळ अन्न खाण्यासाठीच नाही, तर चेहऱ्याचे सौंदर्यदेखील वाढवतात. पण, दररोज ब्रश करूनही अनेकांच्या दातांवरचा पिवळसरपणा जात नाही. अनेकदा चारचौघांत पिवळे दात दिसू लागल्यावर लाजल्यासारखे होते.
अशा वेळी तुम्ही घरच्या घरी दातांचा पिवळेपणा घालविण्यासाठी पुढील उपाय करू शकता.

तुरटीची घरगुती टूथपेस्ट

दातांचा पिवळेपणा कमी करण्यासाठी तुम्ही तुरटी वापरून घरी टूथपेस्ट बनवू शकता. त्यामुळे तुमचे पिवळे दात तर स्वच्छ होतीलच; पण दात किडण्याची समस्याही टाळता येईल.

तुरटीची टूथपेस्ट कशी बनवायची?

पिवळे दात स्वच्छ करण्यासाठी तुरटीपासून टूथपेस्ट बनविता येते. त्यासाठी सर्वप्रथम पॅन गरम करून, नंतर त्यात तुरटीचा तुकडा घाला. त्यामध्ये तो विरघळल्यानंतर तो ग्राइंडरमध्ये बारीक करा. आता त्या तुरटीची बारीक पेस्ट झाली असेल. त्यात ५-६ लवंगा, दोन चमचे बेकिंग सोडा मिसळून, ते सर्व मिश्रण नीट बारीक करून घ्या. अशा प्रकारे तुमची तुरटीची टूथपेस्ट तयार झाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुरटीची टूथपेस्ट कशी लावायची?

तुम्ही दररोज तुरटीपासून बनविलेली ही टूथपेस्ट वापरू शकता. ती वापरण्यासाठी प्रथम टूथब्रश पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या. नंतर थोडीशी तुरटीची टूथपेस्ट टूथब्रशवर टाका. नंतर दातांच्या बाहेरील आणि आतील बाजूने हळुवारपणे ब्रश करा. त्यामुळे तुमच्या दातांवरील पिवळेपणा दूर होऊ लागेल. नंतर पाण्याने गुळण्या करून, तोंड व्यवस्थित स्वच्छ करा