बऱ्याचवेळा आपण पाहतो की आपल्या ओळखीचे किंवा मग आपण स्वत: पैसा टिकत नाही अशी तक्रार करतो, म्हणजेच आपण कितीही मेहेनत केली किंवा मग कितीही बचत करण्याचा प्रयत्न केला तरी देखील आपल्या हातात पैसा येत नाही किंवा आला तरी तो टिकत नाही. एवढचं काय तर अनेक लोक बजेट न ठरवता पैसे खर्च करतात. यामुळे देखील त्यांना पैसा पूरत नाही. नेहमीच याला कारणीभूत ती व्यक्ती नाही तर कधी कधी पर्समध्ये ठेवत असलेल्या या गोष्टी ही असू शकतात. आपण नकळत बऱ्याचशा अशा गोष्टी करतो. ज्याचा परिणाम आपल्या घरात येणाऱ्या लक्ष्मी वर होतो आणि आपल्याकडे पैसे उरत नाहीत.

आपल्या हातात पैसे न टिकून राहण्याचा संबंध हा आपल्या पर्सशी देखील असू शकतो असे वास्तुशास्त्रामध्ये सांगितले जाते. त्यामुळे तुम्ही प्रत्येक वस्तू पर्स किंवा पॉकिटमध्ये ठेवत असाल, तर ते तुम्हाला थांबवावं लागेल. नाहीतर तुमची नेहमी सुरु असलेली पैशांसाठीची तडफड कधीच संपणार नाही.

Upcoming WhatsApp feature to tell you when someone was recently online will also show you a list of people
लास्ट सीन सोडा, आता व्हॉट्सॲप दाखवणार यादी; कोण, कधी ऑनलाइन आहे मिनिटांत कळणार
Fatty Liver Can Happen Without Drinking Alcohol Check These Changes Signs
मद्यपान न करताही होतो फॅटी लिव्हर; भूक, लघवीचा रंग व त्वचेसह ‘या’ ८ बदलांमधून शरीर देतं संकेत, उपचार काय?
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
narayana murthy experienced hunger for 120 hours hitchhiking in Europe 50 years ago but what happens your body starvation 5 day doctor said
नारायण मूर्ती राहिले होते १२० तास उपाशी; पाच दिवस उपाशी राहिल्याने शरीरावर काय परिणाम होतात?

आणखी वाचा : ग्रहांचा राजा सूर्य मीन राशीत करणार प्रवेश गोचर, जाणून घ्या कोणत्या राशींना होणार फायदा

चला तर जाणून घेऊया पर्समध्ये कोणत्या गोष्टी ठेवायला नको.

१. असे बरेच लोक असतात जे पर्समध्ये देवाचा फोटो ठेवतात किंवा असा कोणताही कागद ठेवतात ज्यामध्ये देवाचा फोटो असतो. पण ही खूप मोठी चूक असू ठरु शकते. कारण, असं केल्यानं तुम्ही कर्जाच्या ओझ्याखाली आणखी दबत जातात.

२. बरेच लोक त्यांच्या पर्समध्ये जुन्या बिल-पावत्यांचे बंडल घेऊन जातात. परंतु त्यांच्या या सवयीमुळे त्यांचे पैसे कमी होतात.

३. बरेच लोक पर्समध्ये आपल्या मृत नातेवाईकांचे फोटो ठेवतात. त्यांच्याशी आपण भावनिकदृष्ट्या जोडलो आहोत असे त्यांचे मत असते. पण पर्समध्ये मृत व्यक्तीचा फोटो ठेवल्याने लक्ष्मी नाराज होते. असे वास्तुशास्त्रामध्ये सांगितले जाते.

आणखी वाचा : शनीच्या राशीत शुक्राचा प्रवेश, ‘या’ ४ राशींसाठी बनवत आहे ‘धन योग’!

४. धारदार किंवा टोकदार वस्तू किंवा धातूच्या वस्तू कधीही पर्समध्ये ठेवू नका. ते आपल्यासोबत नकारात्मकता आणतात आणि पैशाचे नुकसान करतात.

५. फाटलेली पर्स कधीही वापरू नका, असे केल्याने माता लक्ष्मी क्रोधित होऊन व्यक्ती दरिद्री बनते.

(येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)