Toilet Mistakes: सकाळी उठल्यावर पोट नीट साफ नाही झालं तर दिवसभर कामात मन लागत नाही आणि शरीर अनहेल्दी असल्यासारखं वाटतं. काही खायची इच्छा होत नाही आणि पोट फुगलेलं, भरल्यासारखं वाटतं. चांगलं पचन आणि स्वच्छ पोट हा आपल्या आरोग्याचा पाया आहे.
आतड्यांचं आरोग्य (गट हेल्थ) फक्त पचनापुरतं मर्यादित नसून ते प्रतिकारशक्ती, ऊर्जा आणि एकूणच आरोग्यावर परिणाम करतं. आतड्यांचे आरोग्य (गट हेल्थ) बिघडले तर बद्धकोष्ठता, पोट फुगणे, पोटदुखी आणि कधी कधी गंभीर आजार होऊ शकतात.
खरंतर, अनेक लोक शौच करताना काही चुका करतात, ज्यामुळे हळूहळू आतड्यांचे आणि पोटाचे गंभीर आजार होऊ शकतात. तज्ज्ञांच्या मते सकाळची वेळ शौचासाठी सर्वात चांगली असते. पण, चुकीची बसण्याची पद्धत, जास्त जोर लावणे किंवा खूप वेळ टॉयलेटवर बसणे हे पचन बिघडवू शकतं. या सवयींमुळे मोठे आजार होण्याचा धोका वाढतो. हार्वर्ड, स्टॅनफोर्ड आणि एम्समध्ये प्रशिक्षण घेतलेले गॅस्ट्रोएंटेरोलॉजिस्ट डॉ. सौरभ सेठी यांनी ५ महत्त्वाच्या टॉयलेटच्या सवयी सांगितल्या आहेत, ज्या गट हेल्थ सुधारतील आणि पोटाच्या समस्या कमी करतील.
टॉयलेट सीटवर जास्त वेळ बसणं टाळा (How to sit on Toilet Seat)
डॉ. सेठी यांच्या मते, टॉयलेट सीटवर (कमोडवर) जास्त वेळ बसणे आणि जोर लावणे हे आतडे आणि गुद्द्वारासाठी नुकसानकारक आहे. त्यामुळे मुळव्याध आणि गुदद्वाराला भेगा (फिशर) होऊ शकतात. जर १० मिनिटांत सहज शौच झालं नाही, तर वारंवार जोर लावण्यापेक्षा थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करावा, यामुळे गट हेल्थ चांगली राहते आणि पचनतंत्रावर जास्त ताण येत नाही.
पेनकिलरच्या गोळ्या कमी वापरा
वारंवार पेनकिलर, जसे पॅरासिटामॉल आणि इबुप्रोफेन (Ibuprofen) घेणे गट हेल्थसाठी हानिकारक ठरू शकते. याचा दीर्घकाळ वापर केल्यास आतड्यांमध्ये सूज, अल्सर आणि रक्तस्त्राव होण्याचा धोका वाढतो. या औषधांमुळे आतड्यांमधील नैसर्गिक बॅक्टेरियाचे संतुलनही बिघडते. जेव्हा दुखणं कमी करण्यासाठी औषध घेण्याची गरज भासेल, तेव्हा कमी प्रमाणात आणि कमी वेळासाठी घ्या किंवा डॉक्टरांचा सल्ला घेऊन पर्यायी उपचार करा.
बॉवेल पॅटर्न (पोट कसे आणि किती वेळा साफ होतं)
प्रत्येक व्यक्तीचा बॉवेल पॅटर्न वेगळा असतो. काही लोकांना रोज शौच होतं, तर काहींना २-३ दिवसांनी. सामान्य शौच नरम, सहज बाहेर येणारं आणि सॉसेज किंवा सापासारखं आकाराचं असावं. जर अचानक बद्धकोष्ठता, पोटदुखी किंवा शौचात बदल ३ दिवसांपेक्षा जास्त राहिला, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
तंतुमय (फायबर) असलेले पदार्थ खा
गट हेल्थसाठी फायबर खूप महत्त्वाचं आहे. हे शौच नरम करतो आणि सहज बाहेर येण्यास मदत करतो. आहारात पुरेसे फळे, भाजीपाला, संपूर्ण धान्य, डाळी आणि बीन्स घ्या. फायबर आतड्यांमधील चांगल्या बॅक्टेरियाला खुराक देतो, ज्यामुळे पचन आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. फायबर घेताना पुरेसे पाणी प्यायला हवे, नाहीतर बद्धकोष्ठतेची समस्या होऊ शकते.
गोड पेये आणि प्रक्रिया केलेलं मांस कमी खा
डॉ. सेठी यांच्या मते, सोडा, साखरयुक्त ड्रिंक्स, सॉसेज, बेकन आणि हॅमसारखे प्रक्रिया केलेले पदार्थ गट हेल्थसाठी हानिकारक आहेत. हे आतड्यांमध्ये सूज निर्माण करतात आणि चांगल्या बॅक्टेरियाचं संतुलन बिघडवतात. दीर्घकाळ खाल्ल्यास इर्रिटेबल बाउल सिंड्रोम (IBS) आणि कॅन्सरचा धोका वाढू शकतो. याऐवजी पाणी, साखर नसलेला फळांचा रस आणि हर्बल टी घ्या.
योग्य स्थितीत बसा
टॉयलेटल्या गेल्यावर कमोडवर किंवा टॉयेलेट सीटवर बसताना पाय थोडे उंच करून बसण्याची पद्धत (स्क्वाटिंग पोझिशन) वापरा त्यामुळे शौच सोपं होतं. यासाठी छोटं स्टूल वापरता येऊ शकते. डॉ. सौरभ सेठी यांच्या मते, गट हेल्थ फक्त आहाराने सुधारता येत नाही, तर योग्य टॉयलेट सवयी पाळणंही तितकंच महत्त्वाचं आहे.