Tomato for skin care: टोमॅटो आरोग्यासह त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. याचा वापर अनेक फेस पॅक्समध्येही केला जातो. फेस पॅक्स त्वचेत चमकदारपणा आणतात.सोबतच त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यातही टोमॅटो प्रभावी ठरतो. अँटिऑक्सिडंट, अँटिबॅक्टेरियल आणि अँटीफंगल, व्हिटॅमिन सी, लायकोपिन असे अनेक एलिमेंट्स टोमॅटोमध्ये असतात. टोमॅटो चेहऱ्यावरची काळी वर्तुळं दूर करतं. चेहऱ्यावरचे इतरही डाग साफ करण्यासाठी टोमॅटो प्रभावी ठरतो. चेहऱ्याला एकदम सुंदर, ताजा बनवतो. टोमॅटोपासून बनवता येतील असे काही फेस पॅक कुठले हे समजून घ्या.

टोमॅटो आणि मधाचा फेस पॅक –

Skin care tips jaggery face pack helpful to glowing your skin
चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागल्या? गुळाचा करा खास वापर; त्वचा दिसेल तरुण- चमकदार
mini paneer sabudana vada recipe
Recipe : तेलात न तळता बनवा साबुदाण्याचे कुरकुरीत ‘प्रोटीनयुक्त’ मिनी वडे! बनवताना घाला फक्त ‘हा’ पदार्थ
Overhydration: This is what happens if you drink too much water What Is Overhydration
सावधान.! जास्त पाणी पिणे आरोग्यासाठी ठरते धोकादायक; वजनानुसार दररोज किती पाणी प्यावे?
5 Indian fruits that keep you hydrated during summer
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी होईल मदत; उन्हाळ्यात करा ‘या’ ५ फळांचं सेवन

पिकलेल्या टोमॅटोची प्युरी करा त्यात १ चमचा मध घाला आणि चांगले मिक्स करा. हे मिश्रण चेहऱ्यावर २० मिनिटे लावून ठेवा आणि कोमट पाण्यानं धुवुन टाका. हा फेस पॅक त्वचेला मॉइश्चरायझ करण्यात मदत करतो.

टोमॅटो, लिंबू आणि दही फेल मास्क –

टोमॅटो, दही आणि लिंबाचा रस एकत्र लावल्यामुळे त्वचेला फायदा होतो. हा मास्क नॅचरल ब्लीचचं काम करतो. या मास्कमुळे चहेऱ्यावरील त्वचेचे केस कमी होतात. त्वचा तजेलदार आणि चमकदार होते.

टोमॅटो आणि गव्हाच्या पीठाचा मास्क –

पिकलेल्या टोमॅटोची प्युरी करा आणि गव्हाच्या पिठामध्ये पूर्णपणे मिसळा. तयार मिश्रण आपल्या चेहऱ्यावर लावा आणि २० मिनिटे राहू द्या. २० मिनिटांनंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. हा फेसपॅक तुमच्या चेहऱ्याची चमक वाढवण्यात मदतशील ठरतो. हा त्वचेवरचं विनागरजेचं असं तेल काढून टाकतो. 

टोमॅटो आणि हळदीचा मास्क –

टोमॅटोच्या प्युरीमध्ये हळद पावडर घाला आणि नीट मिक्स करा. मिश्रण चेहऱ्यावर लावल्यानंतर २० मिनिटे तसेच चेहऱ्यावर राहुद्यात. हा फेस मास्क त्वचेला उचळ करण्यास मदत करतो.

हेही वाचा >> मिलेट्स दूध म्हणजे काय? रोजच्या आहारात सेवन करू शकता का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या त्याचे फायदे

वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.