डोकेदुखी ही एक सामान्य समस्या आहे. मात्र यामुळे अस्वस्थता जाणवू लागते. अनेकदा बदलत्या ऋतूनुसार ही समस्या वाढत जाते. यात पावसाळ्यात हवेतील दमटपणा आणि आर्द्रतेमुळे डोकेदुखीची समस्या त्रासदायक ठरते. पण या समस्येला सामोरे जाण्यासाठी तुम्ही आजीच्या बटव्यातील खालील उपाय करुन पाहू शकता.
पावसाळ्यात डोकेदुखीची समस्या का वाढते?
पावसाळ्यात हवेतील आर्द्रता वाढते, अशा परिस्थितीत अनेकांना डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. याचे कारण डिहायड्रेशन असू शकते. या ऋतूमध्ये खूप घाम येतो यात योग्य प्रमाणात पाणी न प्यायल्यास त्रास होऊ शकतो. महिलांना उष्णतेचा त्रास जास्त होतो अशावेळी केस घट्ट बांधल्यास डोकेदुखी वाढते. तुम्हाला तीव्र डोकेदुखीची समस्या जाणवत असेल आणि कोणतेही औषध किंवा गोळी काम नसेल करत तर तुम्ही तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डोकेदुखीचा सामना करण्यासाठी तुम्ही आजीच्या बटव्यातील काही उपाय वापरून पाहू शकता.
डोकेदुखीवर आजीच्या बटव्यातील काही उपाय
१) तीव्र डोकेदुखीचा सामान करत असल्यास तुम्ही अंगावर थंड शॉवर घ्या आणि कपडे बदला.
२) तुमच्या आवडीचे हेअर ऑइल गरम करा आणि नंतर ते केसांना हलक्या हातांनी लावून मसाज करा.
३) यासाठी घरातील एका सदस्याची मदत घ्या.
४) यानंतर तुम्ही पूर्णपणे आराम करा आणि फोनपासून दूर राहा.
५) मसाज केल्यानंतर केस थोडे सैल बांधून ठेवा.
‘या’ टिप्स करा फॉलो
१) डोकेदुखीवर तुम्ही तुळस आणि मध मिसळून पेय तयार करा.
२) यासाठी तुळशीची पाने धुवा नंतर पाने आणि मध गरम पाण्यात टाकून धुवा.
३) काही वेळ ते पाण्यात राहू द्या ते थोड कोमट झाल्यास ते सीप करुन प्या.