भारतात उन्हाळ्याचा कहर हळूहळू वाढत आहे, अशा परिस्थितीत चेहऱ्याच्या त्वचेची काळजी घेण्याची नितांत गरज आहे. उन्हाळ्यात घामामुळे त्वचेवर खूप जळजळ होते. यामुळे त्वचेवर डाग आणि पिंपल्स देखील होतात. तसेच संवेदनशील त्वचा असणाऱ्यांना उन्हाळ्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. उन्हाळ्यात लालसरपणा, पुरळ आणि काळे डाग ही सामान्य बाब आहे. या सर्व समस्या टाळण्यासाठी लोक अनेकदा बाजारातील अनेक महागडे पदार्थ वापरतात. पण तरीही परिणाम होत नाही. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही उन्हाळ्यातील त्वचेच्या सर्व समस्या टाळू शकता.

तुळस-पुदिना घालून आइसक्यूब बनवा
उन्हाळ्यात त्वचेवर आइसक्यूब लावणे खूप चांगले असतं. अशावेळी तुम्ही बटाट्याचे आइसक्यूब त्वचेवर लावू शकता. याशिवाय पुदिना आणि तुळशीचे आइसक्यूब देखील खूप फायदेशीर आहेत. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर बटाट्याचे आइसक्यूब त्वचेवर लावू नका.

IceCube साठी साहित्य
तुळशीची पाने
पुदीन्याची पाने
गुलाब जल
पाणी

आणखी वाचा : उन्हाळा वाढला की पोट बिघडायला लागलंय? या ६ गोष्टींचा आहारात समावेश करा, लगेच आराम मिळेल

आइसक्यूब कसे तयार करावे?
एक कप पाणी घ्या आणि त्यात ६-७ तुळस आणि ६-७ पुदिन्याची पाने भिजवा. थोड्या वेळाने ते चांगले धुवून कुस्करून घ्या. तुम्ही त्यांची पेस्ट देखील बनवू शकता. आता १ कप पाण्यात कुस्करलेली पाने टाका आणि तुम्हाला ते उकळवावे लागेल. किमान १ उकळी येईपर्यंत गॅसवर ठेवा आणि त्यानंतर थंड होऊ द्या. थंड झाल्यावर त्यात गुलाबजल टाका. आणि त्यांना बर्फाच्या ट्रेमध्ये ठेवून गोठण्यासाठी सोडा.

IceCube कसे वापरावे
यासाठी रोज एक आईसक्यूब काढा आणि गोलाकार हालचालीत चेहऱ्यावर चोळा. जर तुमची त्वचा संवेदनशील असेल आणि तुम्ही थेट चेहऱ्यावर आईसक्यूब लावू शकत नसाल, तर तुम्ही ते कापसाच्या रुमालात गुंडाळून लावू शकता.

(टीप: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य समजुतींवर आधारित आहे. ते अवलंबण्यापूर्वी, वैद्यकीय सल्ला जरूर घ्या.)