Washing Machine Oil Hack: आज घराघरात वॉशिंग मशीन ही अगदी आवश्यक गोष्ट झाली आहे. कपडे धुणं असो वा त्यांना व्यवस्थित स्वच्छ करणं, मशीनशिवाय कल्पनाही करता येत नाही. पण, तुम्ही कधी ऐकलंय का की मशीनमध्ये तेल टाकलं तर कमाल होते? हो, अगदी खरं! सोशल मीडियावर एक भन्नाट व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यात महिला वॉशिंग मशीनसाठी असा जुगाड दाखवतेय की पाहणाऱ्यांना डोळ्यावर विश्वासच बसत नाही.
व्हिडीओमध्ये ती महिला अगदी साध्या पद्धतीने सांगते की, मशीनच्या वरच्या भागावर काही थेंब खोबरेल तेल टाकायचं आणि मग ते एका मऊ कापडाने सर्व बाजूंनी पसरवून मशीन पुसायचं. फक्त मागील बाजू जिथं वायर असतात, तो भाग सोडून बाकी तिन्ही बाजूंवर हा उपाय करायचा.
सुरुवातीला ऐकताना तुम्हालाही वाटेल, “अरे! तेल आणि मशीनचा काय संबंध?” पण एकदा हा व्हिडीओ बघितला की तुम्हाला लक्षात येईल की ही साधी ट्रिक किती अफलातून आहे. कारण वॉशिंग मशीनवर पाण्याचे डाग, पांढरे ठिपके, स्क्रॅचेस हे सगळे नेहमीच्या साफसफाईत काही केल्या जात नाहीत. जास्त घासलं तर मशीनची चमकच निघून जाते.
पण, तेलाचा हा छोटासा जुगाड केल्यावर मात्र चित्रच बदलतं. महिला दाखवते की तेल लावल्यापूर्वी आणि तेल लावल्यानंतर मशीनमध्ये किती फरक पडतो. मशीन एकदम नव्यासारखी झळाळून जाते. दिसायला सुंदर, डागमुक्त आणि चकचकित!
लोकांच्या मनात लगेच प्रश्न येतो, “मशीनवर तेल लावलं तर कपड्यांना तेल लागत नाही का?” यावर महिलेचं स्पष्ट उत्तर – “नाही!” कारण तेल कापडाने नीट पुसून घेतलं जातं, त्यामुळे कपड्यांवर त्याचा परिणाम होत नाही. ती महिला तर म्हणते की ती हा उपाय आठवड्यातून एकदा करते आणि मशीन नेहमी झळाळतं राहातं.
तर मग वॉशिंग मशीनमध्ये तेल टाकल्याने नक्की काय होतं?
यामुळे मशीनवरील पाण्याचे डाग, पांढरे ठिपके, छोटे स्क्रॅचेस गायब होतात आणि मशीनला नव्यासारखी चमक मिळते. थोडक्यात सांगायचं तर दिसायला लहानसा उपाय, पण फायद्याचा मात्र मोठा.
@palpalrealvlog2879 या यूट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा जुगाड करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
येथे पाहा व्हिडीओ
(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या व्हिडीओवर आधारित आहे. हा उपाय अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. लोकसत्ता याची पुष्टी करत नाही.)