डॉ. बिपीनचंद्र भामरे

हृदय आणि रक्तवाहिन्या या दोघांचा एकमेकांशी घनिष्ठ संबंध असतो, हे सर्वांनाच माहित आहे. परंतु, या रक्तवाहिन्यांमध्ये काही कारणास्तव दोष निर्माण झाल्यास हृदयासाठी हे अतिशय घातक ठरू शकते.हृदयाकडे रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्यांची कार्यक्षमता बिघडल्यास हृदयविकाराचा झटकाही येऊ शकतो. यासाठी योग्य निदान आणि त्वरीत उपचार होणं ही काळाची गरज आहे.

china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
Gajlaxmi Rajyog
येत्या ७ दिवसांनी ‘या’ राशींचे येणार चांगले दिवस? ‘शुभ योग’ बनल्याने लक्ष्मी कृपेने बँक बँलेन्समध्ये झपाट्याने होऊ शकते वाढ
Surya Gochar 2024
Surya Gochar 2024 : २४ तासांमध्ये पालटणार ‘या’ राशींचे नशीब, एका महिन्यात मिळणार भरघोस पैसा अन् यश
The price of gold reached the highest level
विश्लेषण: सोन्याला तेजीची झळाळी का?

हृदय हा शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करणाऱ्या स्वतःच्या रक्तवाहिन्या असतात. या रक्तवाहिन्यांच्या जाळ्यामधून हृदयास शुगर, प्राणवायू व इतर आवश्यक घटक प्रत्येक भागात पोहोचतात. ज्यावेळी या रक्तवाहिन्यांची रुंदी कमी होते किंवा पूर्णपणे बंद होते. त्यावेळी हृदयाच्या अन्य भागांमध्ये शुद्ध रक्ताचा पुरवठा होण्यास अडथळा निर्माण होतो. परिणामी, रक्तप्रवाहामार्फत प्राणवायू न मिळाल्याने हृदयाचं कार्य बंद होऊ शकतं. यालाच आपण हृदयविकाराचा झटका येणं असतो म्हणतो.

हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणाली आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल सिस्टम एकमेकांशी जोडलेले आहेत. यापैकी एकाचे कार्य जरी थांबले. तरी हृदयावर त्यांचा विपरित परिणाम होऊ शकतो. यासाठी आजाराचं योग्य पद्धतीने निदान होणं आवश्यक आहे.

हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी जाणवतात ‘ही लक्षणे

१. हृदयविकाराचा झटका येण्याआधी छातीत जळजळ होणं किंवा उलट्या होणं असा त्रास होऊ शकतो. बऱ्याचदा लोक अपचन (अँसिडिटी) झाल्याचा समज करुन घरगुती उपाय करतात. परंतु हा त्रास पुढे वाढून हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

२. छातीत हलके दुखणे, श्वास घेताना त्रास होणं, ताप आणि जीव घाबरा होणे.

३. हृदयाचा झटका येण्यापूर्वी पोटदुखी आणि हृदयाच्या उजव्या बाजूला दुखू लागते, ही लक्षणे कालांतराने तीव्र होऊ शकतात. वारंवार पोटाच्या मध्यभागी आणि उजव्या बाजूच्या भागाजवळ वेदना होते.

४. घाम येणं, मळमळणे आणि थकवा जाणवणे, ही तीन लक्षणे हृदयाच्या स्नायूमध्ये रक्ताची गुठळी होण्याची चिन्हे असू शकतात. हा त्रास वारंवार होऊ लागल्या काळजी घ्यावी.

५. हृदयविकारामुळे आतड्यांमधील दाब वाढल्याने भूक मंदावते. परिणामी, हृदयविकार असणाऱ्या व्यक्तीचे वजन कमी झालेले दिसून येते.

६.हार्मोनल बदलांमुळे, शरीरात चरबी आणि प्रथिने कमी होत आहेत, ज्यामुळे वजन कमी होते.

७. हृदयविकाराची वेदना छाती, खांदा, बेंबीच्या वरच्या भागात, पाठीत किंवा वर जबड्यापर्यंत कोठेही जाणवते.

(लेखक डॉ. बिपीनचंद्र भामरे हे सर एच.एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल अँण्ड रिसर्च सेंटर येथे कार्डिओ-थोरॅसिक सर्जन आहेत.)