डाळ फ्राय, खिचडी, भाज्या अशा कितीतरी वेगवेगळ्या पदार्थांमध्ये आपण लसणीचा वापर करत असतो. आपले भारतीय पदार्थ सोडल्यास पास्ता, पिझ्झा, ब्रेड यांमध्येही लसूण, विशेषतः गार्लिक पावडर [लसूण पावडर] हमखास वापरली जाते. आपण बाजारामध्ये जर ही पावडर विकत घ्यायला गेलो तर त्याची किंमत पाहूनच, तयार गार्लिक पावडर घेण्याचा विचार टाळतो. अशामध्ये आपल्याला घरच्याघरी झटपट गार्लिक पावडर बनवता अली तर?

लसूण सोलल्यानंतर आपण सहसा त्याची सोललेली सालं कचऱ्यात फेकून देतो. परंतु असे न करता त्यापासून, घरीच काही मिनिटांमध्ये गार्लिक पावडर बनवता येऊ शकते. इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरील @Josegarden.official नावाच्या अकाउंटवरून या भन्नाट ट्रिकचा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये, लसणीच्या सर्व भागांचा उपयोग करून, काही मिनिटांमध्ये तयार होणाऱ्या अतिशय सोप्या अशा गार्लिक पावडरची रेसिपी दाखवली आहे, ती पाहूया

हेही वाचा : भांडी आवडली म्हणून उगाच पैसे खर्च करू नका; स्वयंपाक घरातील वस्तू घेण्याआधी ‘या’ पाच टिप्स पाहा

लसणीच्या सालांपासून गार्लिक पावडर कशी बनवावी?

१. सर्वप्रथम सोललेल्या लसणाच्या पाकळ्या बाजूला काढून घेऊन फक्त सालं स्वच्छ धुवून घ्या.
२. धुतलेली सालं एका कापडाच्या साहाय्याने कोरडी करून घ्या.
३. आता ही सालं एका ताटामध्ये किंवा एका ट्रेवर ठेऊन व्यवस्थित वाळवून घ्या.
४. वाळवलेली सालं, एका खलबत्यामध्ये घालून सालांना व्यवस्थित कुटून त्यांना एकदम बारीक करा किंवा मिक्सरमध्ये वाटून बारीक पूड करून घ्या.
५. बारीक केलेली पावडर गाळण्याच्या मदतीने, चाळून घ्या. त्यामुळे बारीक न झालेली सालं वेगळी होतील.
६. तयार पावडर एका काचेच्या बरणीमध्ये भरून झाकण घट्ट लावून घ्या.

“घरात असणाऱ्या लसणीच्या सालांचा उपयोग करून, जर घरातच गार्लिक पावडर तयार केली, तर अन्नाचा अपव्यय टाळला जाऊ शकतो. सोबतच घरी पावडर बनवल्याने, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे प्रिझर्व्हेटिव्हस किंवा ऍडिटिव्ह नसल्याने याच्या चवीवर आणि गुणवत्तेवर नियंत्रण ठेवता येते.” असे क्लिनिकल आहारतज्ज्ञ गरिमा गोएल यांचे म्हणणे आहे, अशी माहिती इंडियन एक्स्प्रेसच्या एक लेखावरून समजते.

View this post on Instagram

A post shared by Joseph Clark (@joesgarden.official)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घरगुती पद्धतीने आणि लसणीचा कोणताही भाग वाया न घालवता बनवलेली ही गार्लिक पावडर खिशाला परवडणारीदेखील आहे. @Josegarden.official या इन्स्टाग्राम अकाउंटने शेअर केलेल्या व्हिडीओला आजपर्यंत ६.१ मिनियन इतके व्ह्यूज आणि २०९K लाईक्स मिळाले आहेत.