वांग्याच भरीत हे प्रत्येकाला आवडतच असतं. कधी कधी वांग्याची तिच तिच भाजी खाऊन कंटाळा आलाय. त्यात तुम्ही वांग्याच्या हटके रेसिपीचा विचार करत असाल तर भरीत हा जरा हटके आणि स्वादिष्ट वेगळ्या अंदाजात तयार करू शकता. यावेळी शेफ कुणाल कपूर यांनी इंस्टाग्रामवर एका पोस्टद्वारे स्वादिष्ट वांग्याचा भरीत बनविण्यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स शेअर केल्या आहेत. काय आहेत त्या टिप्स आणि ट्रिक्स जाणून घेऊयात
तर यावेळी इंस्टाग्रामवर शेफ कुणाल कपूर यांनी जर तुम्ही तुमचा आवडता वांग्याचा भरीत बनवत असाल, तर काही महत्त्वाच्या टिप्स आणि युक्त्या लक्षात ठेवून तुम्ही स्वादिष्ट डिश तयार करण्यास तुम्हाला मदत होईल. तसेच स्वयंपाक करताना तुमच्या कडे सर्व पदार्थ साहित्य असतील तर जेवण बनवणे अगदी सोईस्कर होते. मात्र स्वयंपाक करताना एखाद्या पदार्थात कोणत्या प्रकारचे मसाले साहित्य लागू शकतात हे योग्यरित्या माहीत असणे देखील गरजेचे आहे. याचबरोबर काही स्वयंपाक करतानाचे हॅक्स देखील आपले काम बरेच सोपे करू शकतात. असे यावेळी शेफ कुणाल कपूर यांनी संगितले.
वांग्याचा भरीत करताना तुम्ही पहिल्यांदा वांग्याला कोणतेही बारीक छिद्र नाही ना हे चेक करून घ्या. कारण छिद्र असलेल्या वांग्याना लागण झालेली असते. असा सल्ला यावेळी त्यांनी दिला.
वांग्याचा भरीत करताना भरीत पुरेशा प्रमाणात तयार करण्यासाठी मोठ्या आकाराचे वांगे वापरावे. ही वांगी चांगल्या पद्धतीने भाजून घ्यावे.
आता भाजलेले वांग सोलताना हात चिकट होणार नाही म्हणून हाताला थोड्या प्रमाणात पाणी लावा याने भाजलेले वांग पटकन सोलून निघेल.
वांगी भाजल्यानंतर आता ते पसरवण्यासाठी चमच्याने वापरा करा आणि पुर्णपणे शिजलं आहे का ते पाहून घ्या.
भरीत बनवताना जर वांगी मध्ये अधिक प्रमाणात बिया असतील तर या बिया डिशची चव बदलू शकतात. या करिता भाजलेलं वांग साफ करताना त्यातील बिया काढून टाका.
तसेच यावेळी तुम्ही भाजलेल्या वांग्याच स्वादिष्ट सलाद देखील बनवू शकता.
शेफ कुणाल कपूर यांनी बनवलेली वांग्याच भरीत रेसिपी:-